Friday, April 25, 2025
Homeदेश विदेशSukhbir Singh Badal Firing : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार, सुवर्णमंदिरात जीवघेणा हल्ला…...

Sukhbir Singh Badal Firing : पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांवर गोळीबार, सुवर्णमंदिरात जीवघेणा हल्ला… थरारक VIDEO समोर

पंजाब । Panjab

पंजाबमधून (Panjab) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबिरसिंह बादल (Sukhbir Singh Badal) यांच्यावर हल्ला झाला आहे.

- Advertisement -

अमृतसरमध्ये बादल यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. यावेळी सुखबिरसिंह बादल यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिराजवळ ही घटना घडली आहे. या घटनेने एक मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यातून सुखबीरसिंग बादल हे थोडक्यात बचावले असून हल्लेखोरालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीर सिंह बादल अमृतसर येथील स्वर्ण मंदिराच्या बाहेर दरबान (सुरक्षारक्षक) म्हणून शिक्षा भोगत आहेत. त्याचवेळी हल्लेखोर तिथे आला आणि त्याने बादल यांच्यावर पिस्तूल रोखली.

हल्लेखोराने पिस्तूल रोखताच बादल यांच्या भोवती असलेल्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना घेरलं तर, काहींनी हल्लेखोराला पकडले. मात्र, हल्लेखोराने तरीही गोळ्या झाडल्या. सुदैवाने सुखबीरसिंग बादल हे सुखरुप बचावले आहेत. मात्र, तरीही त्यांच्या सुरक्षेत ही मोठी चूक असल्याचे मानले जाते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...