Saturday, July 27, 2024
Homeनगरमांडओहोळ धरणात नगरचे दोघे बुडाले

मांडओहोळ धरणात नगरचे दोघे बुडाले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

पारनेर तालुक्यातील मांडओहोळ धरणाच्या (Mandohol Dam) मृत साठ्यात पोहण्यासाठी उतरलेले नगर (Ahmednagar) येथील दोन तरुण बुडाले. या दुघर्टनेत अथर्व श्रीनिवास श्रीराम व सौरभ नरेश मच्छा (दोघेही 18 वर्षांचे व रा. शिवाजी नगर, कल्याण रस्ता, नगर) या दोन तरुणांचा मृत्यू (Youth Death) झाला. रविवारी (19 मे) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेने कल्याणरोड-शिवाजीनगर परिसरात शोककळा पसरली. अथर्व व सौरभ हे दोघेही गणपती कारखान्यात मूर्ती करण्याचे काम करायचे. चैतन्य बालाजी सापा, आकाश अनिल हुंदाडे, अभिलाष रघुनाथ सुरम (तिघेही रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता नगर), जीवन दिनेश पाटील (रेल्वेस्टेशन, आगरकर मळा, नगर) तसेच मृत अथर्व श्रीराम व सौरभ मच्छा असे नगर येथील सहा तरुण पारनेर (Parner) तालुक्यात फिरण्यासाठी आले होते.

- Advertisement -

रविवारी दुपारी सर्वजण निघोज येथील रांजणखळगे कुंड पाहण्यासाठी गेले. त्यानंतर निघोज येथील मळगंगा देवीचे दर्शन घेऊन दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मांडओहोळ धरण परिसरात आले. या तरुणांना धरणात पोहण्याचा (Swiming) मोह आवरला नाही. सर्वजण पोहण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवलेल्या धरणाच्या मृत साठ्यात उतरले. काही वेळातच अथर्व व सौरभ पाण्यात बुडू (Drown) लागल्याचे लक्षात आल्यावर त्यांच्या मित्रांनी आरडाओरडा केला. धरणाजवळ सुरू असलेला गोंधळ व आरडाओरडा ऐकून स्थानिक तरुण धरणाकडे धावले. त्यांनी धरणात उड्या मारून बुडालेल्या तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. अथर्वला बाहेर काढण्यात त्यांना यश आले. मात्र, नाका-तोंडात पाणी गेल्याने पाण्यातून बाहेर काढण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सौरभचा शोध सुरू होता. रविवारी रात्री उशिरापर्यंत तो सापडला नव्हता. अखेर आज सोमवारी (20 मे) सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याचा मृतदेह सापडला.

पोखरीचे सरपंच प्रकाश गाजरे यांच्यासह अजय वाघ व परिसरातील तरुणांनी मदतकार्यात भाग घेतला. रविवारी सायंकाळी अंधार पडेपर्यंत सर्व तरुण धरणाच्या पाण्यात बुडालेल्या सौरभचा शोध घेत होते. मात्र, यश आले नाही. त्यामुळे सोमवारी सकाळी सौरभचा शोध सुरू करण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरापर्यंत पोलिस पथक घटनास्थळी थांबून होते. दरम्यान, अथर्वच्या पार्थिवावर रविवारी रात्री अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले तर सौरभचे पार्थिव शवविच्छेदनासाठी सिव्हीलमध्ये आणण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी दुपारी त्याच्या मृतदेहावरही अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवाजीनगर व कल्याणरोड परिसरातील रहिवासी उपस्थित होते.

अखेरची सुट्टी
सौरभ व अथर्व हे गणपती कारखान्यात कामाला होते. गणेशोत्सव आता तीन-चार महिन्यांवर आल्याने मूर्तीची कामे सुरू होती. त्यामुळे त्यांना सुट्टी मिळत नव्हती. मात्र, परत सुट्टीवर जाणार नाही, असा शब्द देऊन ते मित्रांसह फिरण्यास गेले व ही त्यांची सुट्टी अखेरची ठरली. दोघेही कमावते असल्याने दोन्ही कुटुंबांचा आधार तुटला आहे.
- Advertisment -

ताज्या बातम्या