Saturday, November 16, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस"; मंगलप्रभात लोढांचे विधान चर्चेत!

“मॅम नव्हे, माँ अमृता फडणवीस”; मंगलप्रभात लोढांचे विधान चर्चेत!

मुंबई | Mumbai

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कायम चर्चेत असतात. आता त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. मी आजपासून अमृता फडणवीस यांना मॅम नाही तर मॉ अमृता फडणवीस म्हणेल असं विधान भाजप नेते मंगल प्रभात लोढा यांनी केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा अमृता फडणवीस या चर्चेत आल्या आहेत.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

अमृता यांच्या दिव्याज फाऊंडेशनच्या वतीने बुधवारी समुद्र किनारा स्वच्छ करण्याची मोहीम राबविण्यात आली. या वेळी मृता फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आदी मंडळी उपस्थित होती. याच वेळी अमृता फडणवीस यांनी राबवलेल्या मोहिमेचं मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी तोंडभरून कौतुक केलं आहे. शिवाय इथून पुढे आपण त्यांना ‘अमृता मॅडम नाही, तर माँ अमृता’ असं म्हणणार असल्यांही म्हटलं आहे.

मंगल प्रभात लोढा म्हणाले, दिव्याज फाऊंडेशनच्या सर्वेसर्वा अमृता फडणवीस यांना मी विनंती करतो की, समुद्रावरील कचरा साफ करता हे अत्यंत चांगलं काम करत आहात. मात्र, आता तुम्ही राजकारणातील कचरा स्वच्छ करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा. अमृता फडणवीसांनी आता आईचं रुप घेतलं आहे. मुलां-मुलींसाठी त्या जे काम करत आहेत, त्यासाठी मी आजपासून त्यांना अमृता मॅडम नाही, तर माँ अमृता असं म्हणणार. असंही मंगलप्रभात लोढा म्हणाले.

हे हि वाचा : नवाब मलिकांच्या जावयाचा भीषण अपघात; कारचालकाची चूक, ब्रेक ऐवजी एक्सलेटर पाय पडला अन्…

काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत त्यांनी देवेंद्र फडणवीस रोमँटिक नसल्याचं म्हटलं होतं. देवेंद्र फडणवीस कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहेत, त्यांना रोमान्स कळतही नाही आणि जमतही नाही. त्यांना फक्त राजकारण कळतं. अमृता फडणवीस यांचं हे वक्तव्य चर्चेत आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया आल्या होत्या.

मंगल प्रभात लोढा हे अब्जाधीश व्यावसायिक असून त्यांची रिअल इस्टेटमध्ये हुकूमत आहे. ते भारतीय जनता पक्षाचे नेते असून त्यांनी मुंबई भाजपचे अध्यक्षपदही भूषवले आहे. महायुती सरकारमध्ये सध्या ते पर्यटन मंत्रालय, तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री आहेत. लोढा हे १९९५ पासून सलग पाच वेळा दक्षिण मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. ते भारतातील १४ व्या क्रमांकाची सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

हे हि वाचा : लालबागच्या राजाचं विसर्जन, साश्रू नयनांनी भक्तांनी दिला निरोप

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या