Saturday, January 24, 2026
HomeराजकीयManikrao Kokate : "नाशिक सत्र न्यायालयाने फसवणुकीची व्याख्या न समजताच निकाल...

Manikrao Kokate : “नाशिक सत्र न्यायालयाने फसवणुकीची व्याख्या न समजताच निकाल दिला”; कोकाटेंचे वकील अ‍ॅड. रवींद्र कदमांचा जोरदार युक्तिवाद

मुंबई | Mumbai

मुख्यमंत्री स्वेच्छाधिकार कोट्यातून सदनिका घेण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याबद्दल न्यायालयाने (Court) दोन वर्षांची शिक्षा ठोठावलेले राज्याचे माजी क्रीडा आणि युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास तसेच औकाफ मंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी स्वीकारला होता. यानंतर
कोकाटे यांच्या अटकेसाठी शहर गुन्हेशाखेची (City Crime Branch) दोन पथके गुरुवारी (दि.१९) सायंकाळी मुंबईच्या दिशेने रवाना झाली होती. याप्रकरणी कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. त्यावर आज (शुक्रवारी) सुनावणी झाली असता मुंबई उच्च न्यायालयात कोकाटे यांच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला.

- Advertisement -

यावेळी युक्तिवाद करतांना कोकाटे यांचे वकील रवींद्र कदम यांनी सांगितले की, त्यांची तब्येत ठीक नसल्याने त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामुळे त्यांना सोमवार किंवा मंगळवारपर्यंत दिलासा द्यावा, अशी मागणी केली. तसेच सरकारी वकिलांनी अटक वारंट जारी करण्यात आले तरी अजून कोकाटे शरण का आले नाहीत? असा सवाल विचारला. तसेच कोर्टाने अंतरिम आदेश दिलेले नाहीत, असेही म्हटले.

YouTube video player

तसेच कोकाटे यांचे वकील कदम म्हणाले की, १९९४ मध्ये कोकाटेंना म्हाडाने सदनिका दिली. उत्पन्न वाढल्यानंतर सदनिका परत करण्याचा निर्णय नाही. १९९३-९४ मध्ये कोकाटेंचे उत्पन्न वाढले. घराचा ताबा घेतल्यानंतर उत्पन्न सारखं राहत नाही. ते पात्र असल्यामुळे घर मिळाले होते. ताबा घेताना उत्पन्न असेल तर फसवणूक कशी. त्यामुळे तो नियम इतरांना लावला तर अनेकांवर कारवाई होईल. कोकाटेंना कोणतेही खोटे पुरावे, कागदपत्रे दिले नाही, स्वत:च्या सहीची कोणी बनावट सही करेल का? न्यायालयाने फसवणुकीची व्याख्या न समजताच निकाल दिला. त्यामुळे ही फसवणूक नव्हती. यामुळे कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान, यावेळी न्यायालयात कोकाटे यांच्या जुन्या आणि नव्या आर्थिक परिस्थितीचे संदर्भ देण्यात आले. तसेच त्यांच्यावर लावण्यात आलेल्या कलमांचेही विश्लेषण केले गेले. याशिवाय बनावट कागदपत्रांबाबत लावण्यात आलेल्या कलमांबाबत देखील युक्तिवाद करण्यात आला. तसेच काँग्रेस खासदार राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोकाटे यांच्या वकिलांनी दिला. यावेळी हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी कोकाटे यांनी बनावट रेशनकार्ड तयार केले असे, कोर्टात सांगितले. तर सरकारी वकिलांनी फसवणूक केल्याप्रकरणी कोकाटेंना दोषी ठरवण्यात आल्याचे म्हटले.

कोर्टासमोर कोकाटे यांचा मेडिकल रिपोर्ट सादर

यावेळी उच्च न्यायालयापुढे माणिकराव कोकाटे यांच्या वकिलांनी त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात सुरु असलेल्या उपचाराचा अहवाल सादर करण्यात आला. यावेळी त्यामध्ये कोकाटे यांच्यावर दुपारी दोन वाजता अँजिओग्राफी करण्यात आल्याचे सांगितले.

ताज्या बातम्या

पडसाद : अस्तित्वाच्या संघर्षात छोटे पक्ष घायाळ

0
नाशिक महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळविल्याने अनेक छोट्या पक्षांचे अस्तित्वच पुसले गेले आहे. केवळ छोटेच नाही तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसारख्या तुलनेने मोठ्या...