Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रपवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; जरांगेंचे पहिल्यांदाच विरोधकांना आवाहन

पवार, ठाकरे, पटोलेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी; जरांगेंचे पहिल्यांदाच विरोधकांना आवाहन

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणासाठी वर्षभरापासून आंदोलन करणारे मनोज जरांगेंनी दोन दिवसांपूर्वी आपले उपोषण पुन्हा एकदा स्थगित करत राज्य सरकारला १३ ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आता जरांगेंनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि नाना पटोले (Nana Patole) यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे म्हटले आहे. तसेच जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, असेही मनोज जरांगे म्हणाले आहेत. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

- Advertisement -

हे देखील वाचा : संपादकीय : २६ जुलै २०२४ – कळते पण वळणार कधी?

यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “समाजाला मोठे करायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी लढणार आहोत. भाजपच्या लोकांचे डोके काम करत नाही. मला थांबवण्यासाठी प्रयत्न चालू आहेत, मात्र आम्ही त्यांना भाव देत नाही. शेवटी मराठ्यांपुढे शांत बसले नाही तर तुमचे राजकीय करिअर मराठा संपवून टाकेल, असा इशारा त्यांनी भाजप नेत्यांना दिला. त्यासोबतच शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिले पाहिजे की नाही याविषयी आपली भूमिका भूमिका स्पष्ट करावी.जर विरोधक भूमिका स्पष्ट करत नसतील तर सरकारने मराठा आरक्षणाचा निर्णय मार्गी लावावा, विरोधकांची वाट पाहू नये”, असेही जरांगे यांनी म्हटले आहे.

हे देखील वाचा : राज ठाकरेंचा विधानसभेसाठी स्वबळाचा नारा; ‘इतक्या’ जागा लढवणार

तसेच “माझं आणि सरकारचं अजून बोलणं झाले नाही. पावसामुळे सरकार जनतेच्या कामात व्यस्त आहे. आमच्यावर जर अन्याय झाल तर आम्ही पाडापाडी करणार आहे. सरकारमुळे आमचा नाईलाज झाला असून २९ ऑगस्ट रोजी २८८ लढायचे की पाडायचे हे ठरवणार आहे, सर्व समाज एकत्र होणार आहे. गोर-गरीब मराठ्यांना मोठं करायचे असेल तर सर्व सामान्य माणसाची लढाई लढणार आहे.२९ ऑगस्ट रोजी भूमिका जाहीर करू, १४ ते २० ऑगस्ट उमेदवारांची यादी करू. २० ते २७ ऑगस्टला या यादीवर चर्चा करू आणि २९ ऑगस्ट रोजी काय करायचे ते ठरवू”, असेही जरांगे म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या