Monday, October 14, 2024
Homeमुख्य बातम्याManoj Jarange patil : "छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून..."; मनोज जरांगेंचा गंभीर...

Manoj Jarange patil : “छगन भुजबळांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून…”; मनोज जरांगेंचा गंभीर आरोप

मुंबई | Mumbai

काल जालन्यातील (Jalna) ओबीसी (OBC) मेळाव्यात बोलतांना मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यावर सडकून टीका केली होती. त्यानंतर भुजबळांच्या या टीकेला जरांगे पाटील यांनी देखील प्रत्युत्तर देत भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा गंभीर आरोप केला. त्यामुळे आता दोघांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे….

- Advertisement -

यावेळी बोलतांना जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचं असल्याने त्यांच्याकडून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री (CM) लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना समजूनही सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणूस ओबीसींसह मराठा समाजाच्या (Maratha Society) मनातून उतरला आहे, असे जरांगे यांनी म्हटले आहे.

“आमच्या वाट्याला याल तर याद राखा”; ओबीसींच्या महाएल्गार सभेतून भुजबळांचा घणाघात

पुढे ते म्हणाले की, “यशवंतराव चव्हाणांचा आमच्यावर प्रभाव आहे. मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण आम्ही मागितलं तर ते म्हणतात आमची मुलं गुरु ढोरं आहेत का? ओबीसी लेकरांचा भुजबळांनी अपमान केला आहे. हा माणूस राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही, आम्ही राज्यात शांतता राखू. मराठा-ओबीसींनी (Maratha-OBC) एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध रहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी केले आहे.

छगन भुजबळ काय म्हणाले होते?

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करतांना म्हणाले होते की, “कोणाचं खाता कोणाचं खाता? असं म्हणतो, पण तुझे खातो काय रे?” तुझ्यासारखं सासऱ्याच्या घरी तुकडे मोडत नाही. आरक्षण काय ते समजून घे आणि आम्हाला म्हणतो आरक्षण द्या. मराठा तरुणांना मला सांगायचे आहे, या दगडाला शेंदूर लावून कोणता देव करायचं आहे? त्याला आरक्षण कळेना, आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही, असे भुजबळ यांनी म्हटले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

नाशकात दोन बिबट्यांचा थरार; एक जेरबंद, एकाचे रेस्क्यू सुरु

- Advertisment -

ताज्या बातम्या