Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil: त्याला पाठवा नाही तर २०२९ ला तुमची फजिती; मनोज...

Manoj Jarange Patil: त्याला पाठवा नाही तर २०२९ ला तुमची फजिती; मनोज जरांगे पाटलांचा अजित पवारांना इशारा

बीड | Beed
नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुकासाठी राष्ट्रवादी पक्षाने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात धनंजय मुंडे यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी देण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट अजित पवार यांना इशारा दिलाय. ‘त्याला पाठवा नाही तर 2029 ला तुमची फजिती होईल’, असा इशारा जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला.

मनोज जरांगे पाटील यांनी अजित पवारांना इशारा देत म्हंटले आहे, “मला जीवे मारण्याचा कट रचला. नार्को चाचणी करण्याची मागणी केली. धनंजय मुंडे माझ्या घातपात करण्यापर्यंत गेले. आता सुट्टी नाही. आता लपायचे नाही. दोघेही सोबत जाऊ”, अशी भूमिका मांडत मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भडकले. ‘त्याला पाठवा नाही तर 2029 ला तुमची फजिती होईल’, असा इशारा जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत घेत त्यांनी धनंजय मुंडेंना नार्को टेस्ट करण्यासाठी यावे ,असे आवाहन जरांगेंनी केले होते. त्यानंतर जरांगेंनी अजित पवारांना इशारा देत २०२९ मध्ये परिणाम भोगावे लागतील असे म्हटलेय. श्री क्षेत्र नारायण गड यांच्यावतीने मंगल कार्यालय उभारण्यात येणार आहे. त्याचा भूमिपूजन सोहळा मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केले. त्याचबरोबर त्यांनी अजित पवारांना देखील इशारा दिला. अजित पवार यांनी आता आधी धनंजय मुंडे आणि माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली. तुम्ही तुमचे राजकारण करा मोठे व्हा. मात्र समाजाला त्रास देऊ नका. पण तुम्ही अन्याय केला तर मी तुम्हाला सोडणार नाही, असे जरांगे म्हणालेत.

YouTube video player

धनंजय मुंडे यांना पक्षाकडून स्टार प्रचारक करण्यात आले आहे. त्याबद्दल जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, “धनंजय मुंडेला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पाठवलं तरी माझी हरकत नाही. त्याला आधी तपासणीसाठी पाठवावे. अजितदादा, तुमच्या मुलाचा घातपात केला असता, तर तुम्ही गप्प बसले असते का? पांघरुण का घालता. २०१९ ला याचा पश्चाताप होईल. त्याला पाठवा नाही तर २०२९ ला तुमची फजिती होईल”, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला.

“अजित पवार, तु्म्हाला एक सांगतो त्याला चौकशीसाठी लवकर पाठवा. मला जीवे मारण्याचा कट रचला. नार्को टेस्टची मागणी मी केली नव्हती. धनंजय मुंडे माझ्या घातपातापर्यंत पोहोचले. आता लपायचं नाही. दोघेही सोबत जाऊ. नार्को टेस्ट करायचीच, आता सगळंच बाहेर येऊ द्या”, असे जरांगे म्हणाले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

नवीन नाशकात प्रचाराचे पैसे न दिल्याने महिलांमध्ये हाणामारी

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik प्रचारासाठी बोलाविलेल्या तब्बल ६५ महिलांना दिवसभर ताठकळत ठेवत अन्न पाण्याशिवाय पैसे न दिल्याने दोघा महिलांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार घडल्याने...