Friday, September 20, 2024
Homeक्रीडाParis Olympics 2024: मनू भाकर रचणार इतिहास! २५ मिटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम...

Paris Olympics 2024: मनू भाकर रचणार इतिहास! २५ मिटर पिस्तूल स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी ठरली पात्र

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताच्या मनू भाकर हिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग दोन पदके जिंकून इतिहास रचला आहे. आता मनू भाकर तिसऱ्या पदकाच्या शर्यतीत आहे. एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मनूने तिसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. मनू भाकर शुक्रवारी २५ मीटर पिस्तूल प्रकारात फायनलसाठी पात्र ठरली. उद्या शनिवारी दुपारी १ वाजता ती फायनलमध्ये खेळेल.

- Advertisement -

पात्रता फेरीत मनूने महिलांच्या २५ मिटर पिस्तूल प्रकारात दुसरे स्थान पटकावले. तिने प्रिसिझन राऊंडमध्ये २९४ आणि रॅपिड राऊंडमध्ये २९६ गुण मिळवले. मनूचा एकूण स्कोअर ५९० होता आणि तिने २४X गुण मिळवले. या फेरीत हंगेरीची मेजर वेरोनिका पहिल्या स्थानावर राहिली. तिने प्रिसिझन राऊंडमध्ये २९४ आणि रॅपिड राऊंडमध्ये २९८ गुण मिळवले. वेरोनिकाचा एकूण स्कोअर ५९८ होता आणि तिने २७X म्हणजेच परफेक्ट १०गुण मिळवले.

रविवारी वैयक्तिक स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर मनूने आणखी एक कमाल केली. भारताची महिला नेमबाज मनू भाकरने ऐतिहासिक कामगिरी करताना दोन कांस्य पदकांवर निशाणा साधला. १० मीटर एअर पिस्तूल मिश्र क्रीडाप्रकारात कांस्य पदकाच्या लढतीत सरबजोत सिंग-मनू भाकर जोडीने कांस्य पदक पटकावले. त्यामुळे ती आता आणखी एक पदक जिंकून हॅटट्रिक करते का हे पाहण्याजोगे असेल.

उद्या म्हणजेच शनिवारी २५ मिटर पिस्तुल स्पर्धेची अंतिम फेरी खेळली जाणार आहे. प्रिसिझन राऊंडनंतर मनू तिसऱ्या स्थानावर होती. मनूचा अंतिम सामना शनिवारी दुपारी १ वाजता होणार आहे. महिलांच्या २५ मिटर पिस्तुल फायनलमध्ये ती पॅरीस ऑलिम्पिकमध्ये तिसरे पदक मिळवण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. हे पदक मिळाल्यास मनू एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत सलग तीन पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरणार आहे. परंतू यावेळी मनू कोणते मेडल मिळवते का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या