Friday, September 20, 2024
HomeUncategorizedमनू भाकरचा डब्बल धमाका; दुहेरी पदकाला गवसणी घालत रचला नवा इतिहास

मनू भाकरचा डब्बल धमाका; दुहेरी पदकाला गवसणी घालत रचला नवा इतिहास

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या मनू भाकर आणि सरबजोत सिंग या जोडीने इतिहास रचला आहे. मनू आणि सरबजोतने शूटींगच्या १० मीटर एअर पिस्तुल मिश्र प्रकारात कांस्य पदकावर निशाणा साधलाय. १० मीटर मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये सरबजोत सिंह याच्यासोबत ब्राँझ मेडल जिंकले आहे. मनू भाकरचे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हे दुसरे मेडल आहे. २२ वर्षीय मनूने ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये एकाच वेळी दोन मेडल जिंकले आहे.

- Advertisement -

मनू भाकर आणि सरबजोत सिंह याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये १० मीटर मिक्स्ड टीम इव्हेंटमध्ये ब्राँझ मेडल जिंकले आहे. दक्षिण कोरियाच्या ली वोन्हो आणि ओह ये जिनशी लढत झाली. एकेरीमध्ये निराशा पदरी पडली असताना सरबजोतने नव्या जोशासह रेंजवर उतरल्यानंतर दोघांनी मिळून जबरदस्त विजय साकारला. भारतीय जोडीने या इव्हेंटमध्ये दक्षिण कोरियाच्या जोडीचा १६-१० ने पराभव केला आणि ब्राँझ मेडल जिंकले. हे पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतले भारताचे दुसरे पदक आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकल्यानंतर हा अभिमानाचा क्षण आहे, आम्ही आनंदी आहोत पण ही कठीण लढाई होती, असे सरबजोत सिंगने म्हटलेय. मनूची इच्छा पूर्ण झाली असून २ पदक जिंकल्याने तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. मनू ही ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारी पहिली महिला भारतीय नेमबाज ठरली.

मनूला रौप्य पदक मिळवण्याची संधी थोडक्यात हुकली. १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात कोरियाच्या ओह ये जिन हीने सुवर्णपदक पटकावले. तर कोरियाच्या की ही किम येजी हीने रौप्य पदक पटकावले. पहिल्या आणि दुसऱ्या स्थानासाठी जोरदार चुरस होती. कोरियाच्या या दोघींनी अुनुक्रमे २४३.२ आणि २४१.३ असा स्कोअर केला. दोघींच्या पॉइंट्समध्ये फक्त २ चा फरक होता. तर मनूने २२१.७ पॉइंट्ससह कांस्य पदकाचा वेध घेतला. तिच्या या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून कौतुक केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या