Friday, November 22, 2024
HomeनाशिकNashik News : संततधारेने घरांची पडझड; दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू

Nashik News : संततधारेने घरांची पडझड; दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

संततधार पावसामुळे (Rain) ग्रामीण भागात (Rural Area) पडझड सुरु झाली असून, वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघींचा विहिरीत बुडून मृत्यू (Drowned in a Well) झाला आहे. गीतांजली अल्केश एखंडे (वय १४) रा. घोडंबे, ता. सुरगाणा, व माधुरी गोकुळ मोरे (वय १९) रा. लिंगामे, ता. कळवण ही मृतांची नावे आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik Dam Storage : जिल्ह्यातील धरणे भरली; कोणत्या धरणांत किती टक्के पाणीसाठा?

तर बोरचोंड (ता. सुरगाणा) येथील अनिल नरेश कणसे यांच्या तसेच पिळुकपाडा येथील खंडू चंदर वाघमारे यांचे घराचे पावसामुळे नुकसान झाले आहे. पाण्याच्या वाढत्या विसर्गामुळे व संततधार पावसामुळे निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) नांदुरमध्यमेश्वर, खेडे उगाव, रौळस पिंपरी येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद केला आहे. चांदोरी येथे गोदावरीची पातळी स्थिर आहे. पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

हे देखील वाचा :  Nashik Rain Update : नाशकात पावसाची संततधार, तर त्र्यंबकला ‘जोर’धार; नागरिकांचे

याशिवाय आंबोडे (ता. सुरगाणा) येथील वसंत नारायण भोये यांच्या घराचेही पावसाने नुकसान झाले आहे. करंजूल येथील रवींद्र काशिनाथ चौधरी यांच्या घराच्या पडवीचे पावसाने नुकसान झाले. चिंचवड येथील महादू किसन जाधव यांच्या घराची भिंत कालच्या पावसामुळे कोसळली असून, घरांचे नुकसान झाले आहे.

हे देखील वाचा : Nashik Rain Update : पालकमंत्री भुसेंनी गोदाघाटावर जाऊन घेतला पाणी पातळीचा आढावा

दुसरीकडे काल झालेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील (Trimbakeshwar Taluka) वेळुंजे येथील वाळू सोमा उघडे यांच्या घराचे पत्रे उडाले आहेत व शिवराम सोमा उघडे यांच्या घराची भिंत पडली आहे. तसेच वावीहर्ष येथील गणपत नामदेव लहामटे यांच्या घराचीही भिंत कोसळली आहे.

हे देखील वाचा :  Nashik Rain Update : जिल्ह्यात पावसाची ‘जोर’धार सुरूच; गोदावरीला यंदाच्या मोसमातील दुसरा पूर

त्र्यंबकेश्वरला ८० टक्के पाऊस

त्र्यंबकेश्वर तालुक्यात दोन दिवसात पावसाने जोर धरल्याने यंदा आतापर्यत सुमारे ८० टक्के पाऊस झालेला आहे. दि.२५ रोजी त्र्यंबकला १२० मि.मी. पाऊस झाला असून वेळुंजे १४५ मि.मी. हरसूल १०८ मि.मी. मिळून सुमारे ३७३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. गतवर्षी पूर्ण पावसाळा होऊनही सुमारे ८० इंच पाऊस झाला नव्हता, यंदा ऑगस्ट महिन्यातच पावसाने ८० टक्के हजेरी लावल्याने आगामी काळात होणारा पाऊस वरंदळ असेल, असे ग्रामस्थांचे मत आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या