Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूज"आपल्याला सत्तेत जावे लागणार…"; मनोज जरांगे पाटील यांचं सुचक विधान

“आपल्याला सत्तेत जावे लागणार…”; मनोज जरांगे पाटील यांचं सुचक विधान

जालना | Jalna
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा हंगाम संपला असून येत्या ४ जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यापाठोपाठ राज्यातील विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. याच वर्षी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लोकसभे पाठोपाठ विधानसभेची रणधुमाळी पहायला मिळणार आहे. अस असतानाच बीड जिल्ह्यात जातीय राजकारण झाल्याचा आरोप करण्यात येत असून दोन समाजात तेढ निर्माण होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे सुरु असतानाच आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सुचक विधान केले आहे जे चर्चेचा विषय ठरत आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे पाटील
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलन हा संविधानाने दिलेला हक्क आहे. जातीय तेढ आणि आरक्षणाचे आंदोलन याचा संबंध नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय. आरक्षणाच्या मागणीत मराठा-ओबीसी वाद आणण्याची गरज नव्हती. बीडमध्ये जातीयवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही. यावर सुधीर मुनगंटीवार, शंभुराज देसाई यांनी उत्तर द्यायला हवे. जातीवाद कुणी केला? आम्ही कधी जातीवाद केला? मराठ्यांनी जातीवाद कुठे केला, आम्ही कधीही जातीवाद केला नाही आणि करूही देणार नाही. बीड जिल्ह्यातील मराठ्यांनी शांत राहावे. लोकसभा गेली आणि आता विधानसभेला बघू असे त्यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी रक्ताचे सॅम्पलच बदलले

पुढे ते असे ही म्हणाले की, बीडमधील जातीवाद थांबवा, आम्ही कुठेही जातीवाद केला नाही. जर जातीवाद थांबला नाही, हा अन्याय बंद करायचा असेल तर आपल्याला सत्तेत जावे लागणार आहे. दुसरा मार्ग शांत राहा. ज्या जातीने मराठ्यांवर अन्याय केलाय त्या जातीच्या उमेदवाराचे नाव घेऊन त्याला पाडल्याशिवाय सोडायचा नाही. आपल्यापुढे पर्याय नाही. विधानसभा जवळ आहेत, जी जात मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याचा माणूस निवडून येऊ द्यायचा नाही. त्याला सत्तेत जाऊ द्यायचे नाही. कारण तो सत्तेत गेल्यास मराठ्यांवर अन्याय करतो. त्यामुळे जातीवाद थांबवावा असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

दरम्यान, तुम्हाला जातीय तेढच निर्माण करायचं असेल तर बघू. वंजारी आणि मराठ्यांचे कधीही काही झालं नाही. आम्ही जातीवाद करत नाही. १ महिनाभर मराठे शांत बसतील. कोण काय काय करतंय ते बघू. अन्याय आमच्याच लोकांवर झालाय. बीड जिल्हा संताची भूमी आहे. आम्ही कधीच ओबीसीच्या दुकानावर जाऊ नका असं म्हणणार नाही. इतक्या खालच्या दर्जाचे विचार आम्ही ठेवणार नाही. १३ तारखेपर्यंत मराठे चांगले होते. त्यानंतर मराठे वाईट झाले. ज्या मराठा आमदारांनी ओबीसी उमेदवारांसाठी काम केले ते मराठा जात संपवावी यासाठी केले का असा प्रश्न समाज विचारणार आहे असेही जरांगे बोलले.

४ जूनला उपोषणाला बसणार?
४ जूनच्या उपोषणावर आपण शंभर टक्के ठाम आहोत. माझ्या समाजाच्या न्यायाचा विषय असून राज्य सरकारने आम्हाला दिलेल्या शब्दाला आज पाच महिने होऊन गेले आहेत. मग राज्य सरकारला अजून किती दिवस पाहिजेत?”,असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या