नाशिक | प्रतिनिधी | Nashik
मराठा समाजास (Maratha Community) कायदेशिर बाबी पूर्ण करुन तत्काळ आरक्षण (Reservation) देण्याच्या मागणीसाठी नाशकात (Nashik) पुन्हा विराट मराठा माेर्चा काढला जाणार आहे. येत्या मंगळवारी (दि.१३) रोजी सकाळी तपाेवनातून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ हाेईल.
हे देखील वाचा : Nashik Crime News : माेटारमनच्या केबिनमध्ये रिल’गिरी’; दाेन घुसखाेर तरुणांना आरपीएफकडून अटक
या माेर्चात हजाराे मराठा बांधव सहभागी हाेणार असल्याने शहर वाहतुकीचे (City Transport) नियाेजन काेलमडणार आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेचे पाेलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी मंगळवारी सकाळी आठ वाजेपासून महत्त्वाच्या मार्गांवर प्रवेश बंदी केली असून तशी अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, सूचविलेल्या पर्यायी मार्गांवरुनच वाहनधारकांनी मार्गक्रमण करावे, असेही आवाहन खांडवी यांनी केले आहे.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात गोंधळ घालण्यासाठी दिल्लीच्या अहमदशाह अब्दालीने काही नेत्यांना…”; ठाण्यातील राड्यानंतर राऊतांचा मनसेवर निशाणा
प्रवेश बंद मार्ग
१) स्वामीनारायण चौक ते कन्नमवार पुलापर्यंत सर्व वाहनांना नाे एन्ट्री
२) मिर्ची हॉटेल सिग्नल ते स्वामीनारायण चाैक
३) संतोष टी पॉईंट ते दिंडोरी नाका ते मालेगाव स्टॅण्ड
४) रविवार कारंजा – सांगली बँक सिग्नल – मेहेर सिग्नल ते सीबीएस (दोन्ही बाजूकडील मार्गांवर प्रवेश बंद
माेर्चेकऱ्यांच्या वाहनांसाठी येथे पार्किंग
संभाजीनगर रोडकडून येणारी वाहने निलगिरी बाग
पेठरोड-दिंडोरीरोडकडून येणारी वाहने पेठराेडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्ड
घोटी- इगतपुरी, मुंबईकडून येणारी वाहने महामार्ग बसस्थानकाशेजारील मोकळी जागा
त्र्यंबकरोडकडून येणारी वाहने गोल्फक्लब मैदान
गंगापूर गावाकडून येणारी वाहने डोंगरे वसतिगृह मैदान व मराठा विद्याप्रसारक कॉलेज
हे ‘पर्यायी मार्ग’ वापरा
छ. संभाजीनगरकडून मिर्ची सिग्नल-अमृतधाम-तारवालानगर सिग्नल-मार्केट यार्ड-पेठराेडमार्गे पुढे
धुळ्याकडून येताना अमृतधाममार्गे तारवालानगर सिग्नल- मार्केट यार्डकडून पेठराेडने शहरात एन्ट्री
दिंडोरी नाक्याकडून पेठ नाका- मखमलाबाद नाका -रामवाडी पुल
दिंडोरी नाक्याकडून बाहेर जाणारी वाहतूक तारवाला चौक -हिरावाडी मार्गे.
व्दारका सर्कलकडून कन्नमवार ब्रीजकडे पुलाखालून जाणारी वाहतूक व्दारका उड्डाण पुलावरून जाईल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा