Friday, November 22, 2024
Homeनाशिकमनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरवात

मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला सुरवात

नाशिक | Nashik
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. पुणे,नगर येथील शांतता रॅलीला भव्य प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या रॅलीचा समारोप आज नाशिक मध्ये होत आहे. तपोवन ते शिवस्मारक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जरांगे पाटलांच्या रॅलीचा समारोप होऊन सी.बी.एस चौकात सभा होणार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा देणारे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपस्थितीत शांतता रॅलीला समारोप होणार आहे. तपोवनातून रॅलीला सुरवात झाली असून मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहे.

पोलीसांचा चोख बंदोबस्त
बॉम्ब शोधक नाशक पथकाने तपोवन, जुना आडगाव नाका, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, मेहेर सिग्नल, सीबीएस, शालिमार या रॅली मार्गावर तपासणी केली.

- Advertisement -

रॅली मार्ग अतिक्रमणमुक्त
मनोज जरांगे पाटील यांच्या रॅली मार्गावरील अडथळा ठरणारे अतिक्रमण महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने जप्त केले. मेनरोड, रविवार कारंज्या, एमजी रोड येथील छोट्या मोठ्या टपरी, रस्त्यांवरील विविध दुकानांचे ब्रॅन्डिंग बोर्ड आदी साहित्य पथकाने जप्त करुन तंबी दिली. त्यामुळे एमजीरोड अन्य रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. तसेच मनपा अतिक्रमण विभागाने किरकोळ विक्रेते व फेरीवाल्यांना आगाऊ सूचना केली होती.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या