Sunday, January 25, 2026
HomeनाशिकManoj jarange Patil Rally: जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा उद्या नाशिकमध्ये समारोप

Manoj jarange Patil Rally: जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा उद्या नाशिकमध्ये समारोप

शहरातील वाहतुक मार्गात बदल

पंचवटी | प्रतिनिधी
मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सध्या सुरू आहे. पुणे,नगर येथील शांतता रॅलीला भव्य प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या रॅलीचा समारोप मंगळवार (ता.१३) रोजी नाशिक मध्ये होत आहे.तपोवन ते शिवस्मारक जिल्हाधिकारी कार्यालय येथे जरांगे पाटलांच्या रॅलीचा समारोप होऊन सी.बी.एस चौकात सभा होणार आहे. यावेळी शांततामय पद्धतीने रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन अखंड मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात आले आहे.

अशी असणार पार्किंगची व्यवस्था
नाशिक शहर, सटाणा, देवळा, मालेगाव, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर येथून येणाऱ्या वाहनांसाठी तपोवनातील निलगिरी बाग, तपोवन तर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यातील वाहनांसाठी गोल्फ क्लब मैदान येथे पार्किंगची व्यवस्था आहे. कळवण, दिंडोरी या तालुक्यातील वाहनांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, पंचवटीत व्यवस्था आहे. पेठ, सुरगाणा मविप्र संस्थेच्या आवारात व्यवस्था आहे.

- Advertisement -

शांतता रॅलीचा मार्ग
तपोवन, जुना आडगाव नाका, निमाणी, मालेगाव स्टॅन्ड मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण केले जाणार आहे. मालेगाव स्टॅन्ड येथे पंचवटी शिवजन्मोत्सव सोहळ्याकडून जरांगे-पाटील यांचे स्वागत होईल. पुढे रविवार कारंजा, सांगली बॅंक सिग्नल, मेहर सिग्नल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय समोरील शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला जाईल. सीबीएस चौकात मार्गदर्शन व शांतता रॅलीचा समारोप तेथे होईल

YouTube video player

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

राज-का-रण : सिव्हिलची ‘शल्यक्रिया’ कधी होणार ?

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक सिव्हिल हॉस्पिटल हे खरंतर गोरगरिबांना चांगले उपचार मिळवून देऊन त्यांचे आशीर्वाद घेण्याचे ठिकाण. तेथे आरोग्याच्या दर्जेदार...