Wednesday, April 30, 2025
Homeब्रेकिंग न्यूज…तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल; शेंडगेंचा इशारा

…तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल; शेंडगेंचा इशारा

मुंबई । Mumbai

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी परत आता चार तारखेला आंदोलनाचा इशारा दिला आहे. मात्र, मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या दडपशाहीला बळी पडून सरकारने सगेसोयरेंबाबतचा निर्णय घेतला तर, ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. सगेसोयरेंच्या निर्णयाचा परिणाम ओबीसी आरक्षणावर होणार आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये या आंदोलनाच्या धडपशाहीला त्याठिकाणी बळी पडून जर सरकारने असं काही निर्णय घ्यायचा प्रयत्न केला, तर ओबीसी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल, असंही प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

प्रकाश शेंडगे म्हणाले, पार्टी हा आमचा पक्ष लोकसभा निवडणुकीत नवीन असताना देखील आम्ही १६ उमेदवार उभे केले आहेत. १३ उमेदवार आमच्या पक्षाच्या चिन्हावर लढलेत. या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही मैदानामध्ये आहोत. ओबीसी बहुजन पार्टी निवडणुकीत उतरली आहे. ही निवडणूक कमी वेळामध्ये साधनं आणि आर्थिक मदत नसताना आम्ही एवढा मोठा प्रमाणात ही निवडणूक लढलो.

प्रकाश शेंडगे म्हणाले, ओबीसींच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये शासनाच्या विरोधात आंदोलन करून या ठिकाणी प्रचंड मोठा उद्रेक होईल. त्यातून जे काय परिणाम होतील सर्व जबाबदारी महाराष्ट्र सरकारवर असेल. कुणबी आणि मराठा हे एकच आहे, असा विषय आलेला आहे. पुढे पण हा विषय सुप्रीम कोर्टाने आणि हायकोर्टाने निकालात लावलेला आहे. खत्री कमिशनने कुणबींमध्ये मराठा येत नाही, अशा अहवालात त्या मेन्शन केला आहेत. येत्या मंगळवारी आमचे शिष्टमंडळ पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि भुजबळ यांना भेटणार आहे. आता नवीन विषय चालू आहे ते ताबडतोड थांबवण्यासाठी आम्ही विनंती करणार आहेत.

कार्यकारिणीची आज बैठक

जय आणि पराजयाची आम्हाला चिंता नाही. किंवा त्याचा पर्वाही नाही. येणारी विधानसभा निवडणूक मात्र पूर्ण ताकतीने लढणार आहोत. उद्या आमची कार्यकारिणीची बैठक आहे, त्यामध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने समोर जायचं, याची रणनीती ठरणार आहे, असेही शेंडगे यांनी स्पष्ट केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

माजी आमदार लहानू अहिरे यांचे निधन

0
अंतापूर । वार्ताहर Antapur बागलाण विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार लहानु बाळा अहिरे (95) यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी जाड (ता. बागलाण) येथील...