Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजManoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा महायुतीला इशारा; म्हणाले…

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा महायुतीला इशारा; म्हणाले…

जालना । Jalana

महाराष्ट्रात महायुतीने विधानसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. तर महाविकास आघाडीचा सफाया झाला आहे. राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी महायुतीने २३० जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दरम्यान, या निवडणुका नंतर मनोज जरांगे यांनी निकालावर पहिली प्रतिक्रिया देत महायुतीला इशारा दिला आहे.

- Advertisement -

मनोज जरांगे म्हणाले, आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता. आम्ही मैदानातच नव्हतो. मी मराठा समाजाला बंधनमुक्त केले होते. त्यांना ज्यांना मतदान करायचे असेल ते करावे, असे मी जाहीर केले होते. त्याप्रमाणे मराठा मतदारांना जे काही करायचे होते, ते केले. त्यामुळे महायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचाही वाटा आहे. मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला आहे. त्यामुळे त्यांनी तिथे तिथे त्यांनी पूर्ण ताकदीने काम केले.

तसेच यावेळी जरांगे यांनी टीका करणाऱ्यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली आहे तर नीट कारभार करा. मराठा समाजाला कोणचेही सोयरसुतक नाही. सरकार कुणाचेही यावे, आम्हाला त्याच्याशी देणेघेणे नाही. तुम्हाला आता आरक्षण द्यावे लागेल. कारण मराठ्यांशी कोणीच भिडू शकत नाही. मी आणि मराठा समाज विधानसभेच्या निवडणुकीत मैदानातच नव्हतो. त्यामुळे आम्हाला यामध्ये घेण्याची गरज नाही. आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही. सरकारने बेईमानी करू नये. सरकारचा शपथविधी झाल्यानंतर आम्ही समाजाची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविणार आहोत. जर आम्हाला दगा दिला तर मराठे छाताडावर बसतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...