Monday, June 24, 2024
Homeनगरचार दिवसांत एसटीला दीड कोटींचा फटका

चार दिवसांत एसटीला दीड कोटींचा फटका

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने गेल्या चार दिवसांपासून नगर विभागातील एसटी महामंडळाच्या बसेस बंद आहेत. या चार दिवसात एसटीच्या 5 लाख 17 हजार किलोमीटर फेर्‍या रद्द झाल्या असून एसटीला दीड कोटींचा फटका बसला आहे.

ऐन सणासुदीच्या काळात त्यांना आर्थिक दणका बसण्याची शक्यता आहे. मराठा आंदोलनामुळे सुरूवातीला मराठवाड्यातील एसटी सेवा विस्कळीत झाली. बीड जिल्ह्यात काही बसची तोडफोड झाल्याने नगर विभागीय कार्यालयाने सोमवारी (दि. 30) बीडकडे जाणारी वाहतूक बंद केली. त्याच दिवशी इतर काही आगारांच्या फेर्‍याही कमी करण्यात आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या