Wednesday, July 24, 2024
Homeब्लॉगमानवी हक्क दिन

मानवी हक्क दिन

मानवी हक्क दिन हा एक राष्ट्रीय दिवस आहे. जो दक्षिण आफ्रिकेतील लोकशाहीच्या प्राप्तीसाठी केलेल्या संघर्षा सोबत दिलेल्या बलिदानाची आठवण करून देतो. जगभरात १० डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. शार्पविले आणि लंगा टाऊनशिपच्या समुदायाने कायद्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढला परंतु वर्णद्वेषी पोलिसांनी त्या ६९ जणांवर गोळ्या झाडल्या. तसेच देशातील इतर भागातही बरेच लोक मारले गेले. ही शोकांतिका शार्पविले हत्याकांड म्हणून ओळखली गेली. यामुळे मानवी हक्कांचे उल्लंघन कसे होते हे जगासमोर आले. २१ मार्च १९६० रोजी झालेल्या या शार्पविले हत्याकांडाच्या स्मरणार्थ हा दिवस मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. १९४८ मध्ये युनायटेड नेशन्स जनरल असेंब्ली (UNGA) द्वारे मानवी हक्कांच्या सार्वत्रिक घोषणा (UDHR) च्या दत्तक स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. १० डिसेंबर १९४८ रोजी पॅरिसमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने घोषणापत्राची घोषणा केली. जी जगातील सर्व क्षेत्रांतील विविध कायदेशीर आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या प्रतिनिधींनी तयार केली होती. ज्यात सर्वांसाठी उपलब्धीचे समान मानक होते व ज्याचे ५०० भाषांहून अधिक भाषांमध्ये भाषांतर झाले होते. हे सर्व व्यक्तींचे मूलभूत हक्क आणि स्वातंत्र्य यावर लक्ष केंद्रित करते.

- Advertisement -

प्रत्येक व्यक्तीला मूलभूत अधिकार, हक्क व स्वातंत्र्य आहे. यासाठी आपण नेहमी सजग राहिले पाहिजे. आपल्या हक्कांसाठी आपण ठामपणे उभे राहिले पाहिजे. बोलले पाहिजे. जर कोणी आपले हक्क हिरावून घेत असेल तर आपण त्याविरुद्ध ठाम लढा दिला पाहिजे. आपण सर्व समान आहोत व सर्वांनाच समान हक्क, अधिकार आहेत. जॉन एफ कॅनडी म्हणतात, जेव्हा एका माणसाचे हक्क धोक्यात येतात तेव्हा प्रत्येक माणसाचे हक्क कमी होतात. म्हणून आपण सर्वांनीच एकमेकाला पाठिंबा देऊन अन्यायाचा विरोध केला पाहिजे. मानवाधिकार हा वंश, जात, राष्ट्रीयत्व, धर्म, लिंग इत्यादीच्या आधारावर मानवाला वंचित ठेवता येत नाही. मानवी हक्क हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे. लोकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हाच खऱ्या अर्थाने यामागचा उद्देश आहे. आरोग्य, आर्थिक, सामाजिक आणि शिक्षण यांचा मानवी हक्कांमध्ये समावेश होतो. जन्मापासूनच मानवाला मानवी हक्क मिळालेले असतात. त्यामुळे जात, लिंग, धर्म, भाषा, रंग आणि राष्ट्रीयत्व हे त्याच्या आड येत नाही. आपल्या देशात २८ सप्टेंबर १९९३ पासून मानवी हक्क कायदा लागू झाला आणि सरकारने १२ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना केली. मानवी हक्क दिन हा मानवाधिकार्‍यांच्या समर्थनार्थ निषेध आहे.

१० डिसेंबर १९९६ रोजी नेल्सन मंडेला यांनी देशाच्या पहिल्या कायमस्वरूपी वर्णभेदानंतरच्या संविधानावर स्वाक्षरी केली. ४ डिसेंबर १९५० रोजी सर्वसाधारण सभेच्या ३१७ व्या पूर्ण सभेत झाले. जेव्हा महासभेने ठराव 423(V) घोषित केला आणि त्या सर्व सदस्य राज्यांना, इच्छुक संस्थांना हा दिवस साजरा करण्यासाठी आमंत्रित केले. १० डिसेंबर रोजी मानवी हक्क क्षेत्रातील संयुक्त राष्ट्र पुरस्कार आणि नोबेल शांतता पुरस्कार ही प्रदान केले जातात. तसेच अनेक ठिकाणी या दिवशी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यप्रदर्शन, सार्वजनिक सभा आणि चर्चासत्रे, मानवी हक्कांच्या संवर्धनासाठी इतर शैक्षणिक क्रियाकलापांचा यात समावेश होतो. ९ डिसेंबर २०१९ रोजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी अध्यक्षीय घोषणेत घोषणा केली की ९ डिसेंबर पासून मानवाधिकार सप्ताह हा सुरू होईल. त्याप्रमाणे तो सुरू झाला. मानवी हक्कांचे समर्थन करण्याचा प्रयत्न करण्याच्या एका विशिष्ट पैलू कडे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी एक थीम निवडली जाते. या थीम मध्ये भेदभाव समाप्त करणे, गरीबीशी लढा देणे, मानवी हक्क उल्लंघनाच्या बळींचे संरक्षण करणे यात समाविष्ट आहे. यावर्षी म्हणजे २०२३ ची थीम सर्वांसाठी स्वातंत्र्य, समानता आणि न्याय आहे.

मलेका शेख-सैय्यद

- Advertisment -

ताज्या बातम्या