Tuesday, February 3, 2026
Homeब्रेकिंग न्यूजBig Boss Marathi 6: प्रतिक्षा संपली! तारीख, वेळ ठरली, बीग बॉस मराठी...

Big Boss Marathi 6: प्रतिक्षा संपली! तारीख, वेळ ठरली, बीग बॉस मराठी सीझन ६ ची घोषणा झाली; होस्ट रितेश देशमुखने केली घोषणा

मुंबई | Mumbai
रितेश देशमुख पुन्हा एकदा ‘भाऊ’च्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्यांच्या दमदार होस्टिंगने यंदाचा सिझन अधिकच खास ठरणार आहे. कारण बीग बॉस ६ ची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी हिंदी ‘बिग बॉस सीझन १९’ च्या फिनालेमध्ये रितेश देशमुखने हजेरी लावत ‘बिग बॉस मराठी ६’ची घोषणा केली. यासोबत रितेशच यावेळीही होस्ट असणार हे कन्फर्म झालं. तर आता ‘बिग बॉस मराठी ६’कधीपासून सुरु होणार? याची तारीखही समोर आली आहे.

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नव्या प्रोमोमुळे बिग बॉस मराठी सिझन 6ची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. “स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय…” या रितेश भाऊंच्या डायलॉगने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. कलर्स मराठी वाहिनीने नवा प्रोमो शेअर करत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. बीग बॉस मराठी ६ चा सीझन ११ जानेवारी २०२६ पासून रात्री ८ वाजता कलर्स मराठीवर पाहता येणार आहे. याशिवाय, डिजिटल प्रेक्षकांसाठी JioHotstarवरही बिग बॉस मराठी सिझन 6 पाहता येणार आहे.

- Advertisement -

स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय
“स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय,” म्हणत रितेश देशमुख घेऊन येत आहे बिग बॉस मराठी सीझन ६. नव्या प्रोमोमुळे महाराष्ट्रात एकच चर्चा, एकच विषय घोळतोय बिग बॉस मराठी सिझन ६. सगळीकडे उत्साहाची लाट उसळली आहे. रितेश भाऊंचा मस्त लूक, दमदार स्वॅग प्रेक्षकांची मने जिंकत आहे. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय…आहात ना तय्यार!” भाऊच्या या वाक्याने प्रेक्षकांची धडधड अजूनच वाढली आहे. नव्या सीझनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मागील सीझनने जबरदस्त धुमशान घातलं आणि यंदाच्या सिझनमध्ये Swag तोच असणार आहे, पण पॅटर्न रितेश भाऊंचा असणार आहे. काय पॅटर्न असणार? कसा लूक असणार? सदस्य कोण असणार? सगळे अजून गुलदस्त्यात आहे.

YouTube video player

यंदाचा सिझन का खास?
मागील सिझनने प्रचंड लोकप्रियता मिळवली होती आणि यंदा त्याहून मोठ्या स्तरावर शो सादर केला जाणार असल्याचे दिसते. बिग बॉस मराठी सिझन 6 चा प्रोमो लार्जर-दॅन-लाईफ असल्याचे स्पष्ट दिसते. भाऊच्या एंट्रीसाठी उभारलेला आलिशान सेट, भव्य मिरवणुकीसारखे वातावरण, ढोल-ताशांचा दणदणीत गजर, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल 250 ते 300 लोकांची उपस्थिती या सगळ्यांच्या साक्षीने हा प्रोमो शूट करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रितेश भाऊ पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत.

प्रत्येक फ्रेममध्ये त्यांचा आत्मविश्वास, देसी अॅटिट्यूड आणि स्टाईल प्रेक्षकांना खिळवून ठेवते. या प्रोमोमुळे अनेक प्रश्नांना उधाण आले आहे. यंदाचा पॅटर्न नेमका काय असणार? घरात कोणते चेहरे दिसणार? कोणाचा नवस पूर्ण होणार आणि कुणाच्या सलामीने घराचे वातावरण झिंगणार? “काही असेही असणार… पण मी गप्प नाही बसणार!” या कडक डायलॉगमुळे पुढे काय घडणार याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik MC Politics : महापालिका सत्ता संघर्षात नवा ट्विस्ट; शिवसेनेच्या चार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik स्वतंत्र निवडणूक लढणाऱ्या भाजपला (BJP) मनपात स्पष्ट बहुमत असतांना त्यांनी शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी अजित पवार गटाला सत्तेत सामील होण्याचा...