Friday, May 16, 2025
Homeमहाराष्ट्र‘हा’ मराठी अधिकारी करणार ‘हैद्राबाद एनकाऊंटर’ची चौकशी

‘हा’ मराठी अधिकारी करणार ‘हैद्राबाद एनकाऊंटर’ची चौकशी

मुंबई | वृत्तसंस्था 

- Advertisement -

हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर एनकाऊंटरची चौकशी तेलंगणा सरकारने सुरु केली आहे. यासाठी आठ सदस्यीय अधिकाऱ्यांची टीम हि चौकशी करणार आहे. याप्रकरणी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली असून मानव हक्क आयोगदेखील याबाबत चौकशी करणार आहे.

या संपूर्ण घटनेची गंभीर दखल घेत राज्य तेलंगणा सरकारने एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. मराठी आयपीएस अधिकारी महेश भागवत यांच्यासह एक टीम ही चौकशी पूर्ण करणार आहे.

भागवत तेलंगणा येथील रच्चाकोंडाचे पोलीस आयुक्त आहेत. हैद्राबादमधील संपूर्ण घटनेची चौकशी करून याबाबतचा अहवाल सादर करण्याचे काम या संपूर्ण टीमकडे असणार आहे.

याप्रकरणी तेलंगणा येथील न्यायालयाने एनकाऊंटर झालेल्या चारही मुलांचे मृतदेह सुरक्षित ठेवण्याचे आदेश  होते. दरम्यान,   न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर हे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात येणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : योग्य वेळ आल्यावर लाडक्या बहिणींना..; काय म्हणाल्या डॉ. नीलम...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून दीड हजार रुपये महिना सुरू असून वाढीव मदतीसाठी महिलांनी कोठे मोर्चे काढलेले दिसत नाहीत. सध्या सरकारसमोर अवकाळी पावसासह...