Sunday, November 24, 2024
Homeमनोरंजनकेदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज, पाहा VIDEO

केदार शिंदेंच्या ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाचा दमदार टीझर रिलीज, पाहा VIDEO

मुंबई | Mumbai

केदार शिंदे (Kedar Shinde) यांचा आगामी ‘महाराष्ट्र शाहीर’ (Maharashtra Shaheer) हा चित्रपट खूप चर्चेत आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात खूप उत्सुकता होती.

- Advertisement -

आज (ता. २० मार्च) या चित्रपटाचा टीजर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या हस्ते रीलीज करण्यात आला. या टीझरमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, यशवंतराव चव्हाण, साने गुरुजी, लता मंगेशकर यांची झलकही पाहायला मिळत आहे.

सासरच्यांनी छळले, विवाहितेने जीवन संपविले

त्याचबरोबर या टीझरमधून शाहीर साबळे यांनी केलेलं कामही उलगडत जातं. अंकुश चौधरीसोबत या चित्रपटात सना शिंदे, अभिनेत्री अश्विनी महांगडे, मृण्मयी देशपांडे भूमिका साकारत आहे. तर या चित्रपटाच्या संगीताची धुरा अजय-अतुल यांनी सांभाळली आहे.

दरम्यान अंकुश चौधरी यांनी साकारलेल्या भूमिकेचे राज ठाकरे यांच्याकडून यावेळी कौतुक करण्यात आले. तर आमची अवस्था सध्या दहावी नापास विद्यार्थ्यांसारखी झाली असल्याचे सुद्धा राज ठाकरे यांनी यावेळी म्हंटले आहे.

भांडणं झाली… रिव्हाॅलवर काढलं… गोळीबार केला… ही काय मोगलाई आहे का? अजितदादा संतापले, पाहा VIDEO

यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, बाळासाहेबांना ‘बाळ’ अशी हाक मारणारे शरीर एक होते. शाहिरांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ घराघरांत पोहोचवली. तर शाहिरांचा प्रवास हा स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीपर्यंतचा आहे. तर जेव्हा मला केदारने चित्रपटाबद्दल सांगितले, तेव्हा मला धाकधूक होती.

मी त्याला प्रश्न विचारला की, शाहीरांचे काम कोण करणार? तर त्याने अंकुश चौधरी उत्तर दिलं. तो शाहीरांसारखा दिसेल का? असा प्रश्न मी त्याला विचारला. तर त्याने मला सांगितलं, तो त्यांच्या भूमिकेत शिरेल. मी आज चित्रपटाचा टीझर पाहिला. मला दिसलं की, अंकुश हा खरंच भूमिकेत शिरला आहे, असे बोलत त्यांनी अंकुश चौधरींच्या अभिनयाचे कौतुक केलं आहे.

भारताचे खलिस्तानींना चोख प्रत्युत्तर; लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावर फडकला पूर्वीपेक्षा मोठा तिरंगा, पाहा VIDEO

यावेळी राज ठाकरे यांनी राजकीय फटकेबाजी देखील केली. २८ एप्रिल हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. पण राज ठाकरे हे त्यावेळी बाहेरगावी असणार आहेत. त्यामुळे याला उद्देशून बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही सध्या १०वी नापास विद्यार्थ्यांसारखे आहोत. निवडणुका या मार्च किंवा ऑक्टोबरमध्ये लागणार अशी चर्चा कायम होत असल्याने दहावी नापास असल्यासारखे वाटत आहे. निवडणूक येत नसते तर वातावरणात असते, सध्या तसे वातावरण नाही, त्यामुळे बाहेरगावी जबर असल्याचे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

प्रवाशी बसचा भीषण अपघात, १९ ठार; मृतांचा आकडा वाढण्याची भीती

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या