औरंगाबाद – Aurangabad
भाजप आणि महाविकास आघाडीसाठी अत्यंत प्रतिष्ठेची असणारी मराठवाडा पदवीधर निवडणुकीत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी हॅटट्रिक केली. चव्हाण यांनी भाजपा उमेदवार शिरीष बोराळकर यांचा पराभव केला. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 116638 तर शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. सतीश चव्हाण 57895 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीत तब्बल 23 हजार 92 मते अवैध ठरली.
औरंगाबाद पदवीधरसाठी दुपारी तीन वाजता मजमोजणीला सुरुवात झाली. सतीश चव्हाण पहिल्या फेरीपासून आघाडीवर होते. पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना 27850 तर शिरीष बोराळकर यांना 11558 मते मिळाली होती. दुसऱ्या फेरीअखेर 28930 मतांनी सतीश चव्हाण आघाडीवर होते. तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 42 हजार मतांची आघाडी मिळाली होती.
तिसरी फेरीत सतीश चव्हाण यांना 26739 तर शिरीष बोराळकर 14471 मते मिळाली. या फेरीत चव्हाण यांना 12268 मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे तिसऱ्या फेरीअखेर सतीश चव्हाण 41198 मतांनी आघाडीवर होते. चव्हाण यांना एकूण 81216 मते तर शिरीष बोराळकर 40018 मते पडली. तिसऱ्या फेरीत 5374 मते अवैध ठरली.
चौथ्या फेरीत सतीश चव्हाण 53611 मतांनी आघाडीवर होते. त्यांना 107916 मते तर शिरीष बोराळकर यांना 54305 मते पडली. या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 12 हजार मतांची आघाडी मिळाली होती. या फेरीअखेर भाजपाच्या समर्थकांनी केंद्र सोडले. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना 116638 तर शिरीष बोराळकर यांना 58743 मते मिळाली. यासोबतच सतीश चव्हाण यांचा 57895 मतांनी विजय झाल्याचे निश्चित झाले.