Saturday, September 21, 2024
Homeनगरनगर-नाशिक विरूध्द मराठवाडा पाणी वाटप संघर्ष यंदा टळला

नगर-नाशिक विरूध्द मराठवाडा पाणी वाटप संघर्ष यंदा टळला

जायकवाडीतील साठा अखेर 67 टक्क्यांच्या पुढे

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून आतापर्यंत तब्बल 55 टीएमसीहून अधिक पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाने बुधवारी दुपारी 65 टक्क्यांची पातळी गाठली. तर रात्री हा साठा 67 टक्क्यांच्या पुढे गेला होता. त्यामुळे पाण्यावरून नगर, नाशिक विरुध्द मराठवाडा यांच्यात होणार्‍या संघर्षाला किमान या वर्षासाठी विराम मिळाला आहे. समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या निकषानुसार 15ऑक्टोंबरपर्यंत जायकवाडी 65 टक्के न भरल्यास गोदावरी खोर्‍यातील वरच्या भागातील नगर-नाशिकमधील धरणांमधून विहित सूत्रानुसार पाणी सोडावे लागते. मागील दुष्काळी वर्षात तशी वेळ ओढावली होती.

तेव्हा जायकवाडीत अपेक्षित जलसाठा झाला नव्हता. त्यामुळे मुळा, प्रवरा, गंगापूर, दारणा, पालखेड समुहातील 22 धरणांमधून 8.99 टीएमसी पाणी जायकवाडीसाठी सोडावे लागले होते. यंदा प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने नाशिक, नगरमधील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा झालेला नव्हता. पण आषाढ आणि श्रावणसरींनी मेहरबानी केली. परिणामी नाशिक, नगरमधील सर्व प्रमुख धरणे तुडूंब भरली. मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पाणी सोडावे लागले. प्रवरा, मुळा, गोदावरी या नद्यांचा पूर आले. याचा लाभ जायकवाडीतील जलसाठा वाढण्यास झाला.

बुधवारी दुपारी जायकवाडी धरणात 50.30 टीएमसी म्हणजे 65.61 टक्के जलसाठा झाला. तर रात्री हा साठा 67 टक्क्यांच्या पुढे गेला.जायकवाडीने ही पातळी गाठल्याने समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या निकषानुसार नाशिक, नगरमधून आता पाणी सोडावे लागणार नाही.त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील नेते, शेतकरी आणि अधिकार्‍यांनी सुटकेचा निःश्वास स सोडला आहे. दरम्यान, बुधवारी सायंकाळी 6 वाजता भंडारदरातून निळवंडेत 6766 क्युसेकने निळवंडेच्या दिशेने विसर्ग सुरू होता. निळवंडेतून प्रवरानदीत 9499 क्युसेकने विसर्ग काल सायंकाळी 6 वाजता करण्यात येत होता. मुळातून 6 हजार क्युसेकने विसर्ग सुरू होता. नाशिकच्या नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरीत 27341 क्युसेकने विसर्ग जायकवाडीच्या दिशेने (पान 4 वर)

- Advertisment -

ताज्या बातम्या