निफाड | प्रतिनिधी | Niphad
तालुक्यात भीषण दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली असून, पाटबंधारे विभाग व वीज वितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांची उभी पिके हातातून निसटून चालली आहे. याबाबत तत्काळ उपाययोजना न केल्यास सोमवारी (दि. ४) निफाड तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) यांनी दिला.
निफाड तालुक्यात सगळीकडे अल्प पावसामुळे (Niphad) दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाणगंगातीरावरील ओझर, दात्याणे, दीक्षी, जिव्हाळे, थेरगाव, ओणे, कसबे सुकेणे, मौजे सुकेणे, खेरवाडी, पिंपळस, चितेगाव या गावांना गंगापूर कॅनॉलचे पाणी सोडण्याबाबत अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कसबे सुकेणे येथे माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.
सबको लाथ अन् मित्रोका विकास; INDIA च्या बैठकीतून उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर हल्लाबोल
यावेळी अनिल कदम यांनी पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनाली शहाणे व शाखा अभियंता पवार यांच्याशी चर्चा करुन १२ सप्टेंबरपर्यंत पाणी सुरु ठेवण्याचे निर्देश दिले. बैठकीत पंचक्रोशीतील शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या.
अनिल कदम यांनी आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला फैलावर घेतले व सुरळीत वीजपुरवठा न झाल्यास सोमवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. तसेच, निफाड तालुक्यातील सर्व वीज कंपनीच्या कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशाराही कदम यांनी मुख्य अभियंता कुमठेकर यांना दूरध्वनीद्वारे दिला.
‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत किस्सा खुर्चीचा! शरद पवार अन् ममता बॅनर्जींमध्ये नेमकं काय घडलं? पाहा VIDEO
यावेळी जि. प. सदस्य दीपक शिरसाठ, कसबे सुकेणे सरपंच आनंद भंडारे, सुनील कदम, आनंद बोराडे, विश्वास भंडारे, बाळासाहेब जाधव, सुहास भंडारे, प्रवीण जाधव, देविदास चौधरी, दत्ता भंडारे, विकास काळे, राजाराम मोगल, प्रकाश मोगल, शाम मोगल, सचिन मोगल, छोटू साळे, अशोक मत्सगार, सुमित पाटोळे, कमलेश साळे, शंकर संगमनेरे, विलास संगमनेर, खंडू बोडके-पाटील, सुभाष आवारे, बाबाजी संगमनेरे, आशिष शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळासाहेब शिंदे, सागर शिंदे, ओंकार शिंदे, सुभाष हुजरे, अशोक पगार, शरद कदम, नंदु जाधव, भाऊसाहेब पगार, जयवंत हुजरे, अजय गवळी, सोनु पगार व शेतकरी उपस्थित होते.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
India Alliance : ‘इंडिया’ आघाडीच्या समन्वय समितीची स्थापना, कोणकोणाचा समावेश?