Thursday, September 19, 2024
Homeनाशिकपेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पेसा क्षेत्रातील पदभरतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

- Advertisement -

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पेसा पदभरती कायमस्वरूपी करण्याच्या मागणीसाठी आज आदिवासी क्षेत्रातील पात्र उमेदवारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावून पेसा क्षेत्रातील पदभरती थांबवली गेली आहे, त्यामुळे इतर सामाजिक प्रवर्गांना नियुक्त्या मिळत असताना पेसा क्षेत्रातील आदिवासी उमेदवार वंचित राहिले आहेत.असा आरोप आंदोलकानी केला.

आदिवासी 17 संवर्ग पेसा पदभरती कृती समितीच्या वतीने ईदगाह मैदानावर गेल्या 21 दिवसापसुन सुरू असलेले आंदोलन आजपासून 13 जिल्ह्यात ग्राम पंचायतीत बंद पाळुन तीव्र केलेे. नाशिकमध्ये प्रथम आदीवासी विकास कार्यालया समोर नंंतर जिल्हा परिषद, व त्यानंतर जिल्हधिकारी कार्यालायवर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले.

पेसा क्षेत्रात अनुसूचित जमातीचे पात्रताधारक आहेत. सरळ सेवेतून भरल्या जाणार्‍या 17 संवर्गापैकी काही संवर्गाच्या परीक्षा झाल्या असून काही परीक्षा अजूनही प्रलंबित आहेत. यामध्ये शिक्षक, कृषी, तलाठी, बहुआयामी आरोग्य सेवक अशा वेगवेगळ्या क्षेत्रासाठी शासनाकडून परीक्षा झाल्या. त्याचे निकाल प्रलंबित तर काही जागांवर आजही भरती प्रक्रिया झालेली नाही.

अनुसूचित जाती जमातीतील संबंधित पात्रता धारकांवर अन्याय होत आहे. राज्यातील अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील 17 संवर्गाची भरती सरळ सेवा नियमाप्रमाणे तत्काळ व कायमस्वरूपी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत आंदोलन सुरू करूनही शासन दुर्लक्ष करत असल्याने आज आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आ. हिरामन खोसकर तसेच लकी जाधव यानी आदोलकांशी चर्चा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या