Saturday, September 21, 2024
Homeदेश विदेशप्रेमासाठी वाट्टेल ते! लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकराच्या घराबाहेरच...

प्रेमासाठी वाट्टेल ते! लग्नाला नकार दिल्यामुळे प्रेयसीने प्रियकराच्या घराबाहेरच…

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

- Advertisement -

प्रेमाबद्दल (Love) प्रत्येकाचे मतं वेगवेगळी असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात प्रेमाची व्याख्यादेखील वेगवेगळीच असते. कुणाला आपल्या देशावर प्रेम असते, कुणाला आपल्या आई-वडिलांवर प्रेम असते, कुणाला आपल्या भावा बहिणीवर प्रेम असते तर कुणाला आपल्या प्रियकर किंवा प्रेयसीवर प्रेम असते. लोक एकमेकांच्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. प्रेम मिळाले नाही की अनेकदा प्रेम मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जात असल्याचे दिसून येते. अशीच एक घटना आता समोर आली आहे…

घडले असे की, झारखंड (Jharkhand) येथील धनबादमध्ये एक प्रेयसी प्रियकराच्या घरासमोर लग्नाची मागणी करत रात्रंदिवस आंदोलन करताना दिसून येत आहे. 96 तासांहून अधिक काळ लोटून गेला तरीही ती मुलगी बोचऱ्या थंडीत बसली आहे.

यामुळे प्रियकर फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे. आजूबाजूचे लोकांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला असून ही मुलगी अजूनही लग्न करण्याच्या निर्णयावर ठाम आहे.

प्रियकराने आपल्या प्रेयसीसोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यानंतर मुलीने त्याच्या घरासमोर बसत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी प्रियकराच्या घरासमोर बेमुदत संपावर बसली असून प्रियकराशी लग्न करण्याची तिची एकच मागणी आहे. मुलीसोबत तिची वृद्ध आजी आणि वडीलही आंदोलनाला बसले आहेत.

संतापजनक! महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहावर अत्याचार

राजगंज पोलीस स्टेशन परिसरात राहणाऱ्या उत्तम महतो या प्रेमीयुगुलाच्या घरासमोर धरजोरी येथील एक तरुणी रात्रंदिवस थंडीमध्ये बसली आहे. ही बाब स्थानिक मुख्याध्यापकाला समजल्यावर त्यांनी मुलीला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुलगी आपल्या निर्णयावर ठाम आहे.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

तरुणीचे म्हणणे आहे की, एसएसएलएनटी कॉलेजमध्ये शिकत असताना दोघांची मैत्री झाली आणि नंतर प्रेम झाले. जवळपास 4 वर्षे प्रेमसंबंध होते आणि दोघांच्या घरातील लोकांना याबाबत माहिती आहे. आधी त्याने लग्नाला होकार दिला होता, आता तो मागे फिरला आहे. जोपर्यंत प्रियकर लग्नासाठी तयार होत नाही तोपर्यंत ती त्याच्या घरासमोर बसून राहणार आहे, असे त्या मुलीचे म्हणणे आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या