Friday, May 3, 2024
Homeधुळेलग्न करून अल्पवयीन मुलीला पळविले

लग्न करून अल्पवयीन मुलीला पळविले

धुळे । Dhule प्रतिनिधी

अल्पवयीन मुलीशी minor girl लग्न married करून तिला पळवून kidnapped नेल्याची घटना तालुक्यातील हेंद्रूण Hendrun येथे घडली आहे. याप्रकरणी एकावर मोहाडी पोलिसात Mohadi police गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

हेंद्रूण येथे राहणार्‍या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या अज्ञानपणाचा रोहन गणेश पाटील (वय 20 रा. मोघण ता. धुळे) याने गैरफायदा घेतला. तिला लग्नाचे आतिष दाखवून फुस लावून पळवून नेले. तसेच तिच्याशी लग्न करून तिला पळवून नेले. ही घटना दि. 6 डिसेंबर रोजी दुपारी 4 ते दि.9 रोजी पहाटे तीन वाजेदरम्यान घडली. अशी फिर्याद मजुरी काम करणार्‍या पिडीत मुलीच्या वडीलांनी मोहाडी पोलिसात दिली आहे.

त्यावरून संशयीत आरोपीवर भांदवि कलम 363, 366 सह अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 चे कलम 3 (2) (व्हीए) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या