Tuesday, February 3, 2026
Homeक्राईमCrime News : पाच विवाहित महिलांचा सासरी छळ

Crime News : पाच विवाहित महिलांचा सासरी छळ

एकाच दिवशी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात महिलांवरील कौटुंबिक छळाच्या घटना दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र असून, केवळ एका दिवसात पाच विवाहित महिलांनी सासरच्या छळाला कंटाळून पोलीस ठाण्यांमध्ये फिर्यादी दाखल केल्या आहेत. यामध्ये मानसिक, शारिरीक छळ, पैशांसाठी होणारी दमदाटी, मारहाण, शिवीगाळ, उपाशी ठेवणे आदी कारणांचा समावेश आहे. संबंधित प्रकरणांवरून विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

भिस्तबाग चौक परिसरात राहणार्‍या विवाहितेने (वय 35) दिलेल्या फिर्यादीवरून पती महेश दत्तात्रय बेरड, सासू हिराबाई दत्तात्रय बेरड, दीर नीलेश दत्तात्रय बेरड (सर्व रा. भिंगार) व नणंद रूपाली विक्रम भुतकर (रा. भुतकरवाडी) यांच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुषणनगर, केडगाव परिसरात राहणार्‍या विवाहितेने (वय 27) दिलेल्या फिर्यादीवरून पती राहुल गौतम साळवे, सासु सुनिता गौतम साळवे, सासरे गौतम राणुजी साळवे, मोठा दीर तुषार गौतम साळवे, लहान दीर स्वप्नील गौतम साळवे (सर्व रा. कल्याण, जि. ठाणे) यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player

जेऊर (ता. अहिल्यानगर) येथे राहणार्‍या विवाहितेने (वय 45) दिलेल्या फिर्यादीवरून पती संतोष भाऊसाहेब दळवी (रा. भाळवणी, ता. पारनेर) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ली शेंडी (ता. अहिल्यानगर) व मुळच्या गणेगाव (ता. राहुरी) येथे राहत असलेल्या विवाहितेने (वय 30) दिलेल्या फिर्यादीवरून पती बाबासाहेब सर्जेराव खंडागळे (रा. गणेगाव) याच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरेगाव (ता. पारनेर) येथील व सध्या निमगाव वाघा (ता. अहिल्यानगर) येथे राहत असलेल्या विवाहितेने (वय 22) दिलेल्या फिर्यादीवरून पती प्रदीप पोपट नरसाळे, सासरे पोपट कान्हु नरसाळे, सासु सुभद्रा पोपट नरसाळे, भाया नागेश्वर पोपट नरसाळे (सर्व रा. गोरेगाव) यांच्याविरूध्द अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Eknath Shinde : लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार २१०० रुपये? एकनाथ शिंदे...

0
मुंबई । Mumbai "माझी लाडकी बहीण योजना ही केवळ घोषणा नसून ती राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणाचे एक मोठे साधन आहे. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार...