Monday, July 22, 2024
Homeनगरविवाहित महिलेवर कोयत्याने वार

विवाहित महिलेवर कोयत्याने वार

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

ऐन नवरात्रीची (Navratri) धामधूम सुरु असताना एका विवाहितेला कोयत्याने व लाकडी दांड्याने मारहाण (Married Woman Beating) केल्याचा गंभीर घटना मंगळवारी (ता.24) पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. संगमनेर (Sangamner) शहरातील मालपाणी हेल्थ क्लब जवळील काशाई माता मंदिराच्या पाठीमागे हा प्रकार घडला असून दोघांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल (Filed a Case) झाला आहे. 

घरगुती वादाच्या कारणातून पत्नीचा खून

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मोबाईल नंबर ब्लॉक केला म्हणून ढोलेवाडीतील राजेश जंबुकर व वैभव दांदे यांनी तक्रारदार महिलेला तिच्या घरी जाऊन जाब विचारला. त्याचवेळी राजेश जंबुकर याने हातातील कोयत्याने वार (Koyata Attack) केले आणि वैभव दांदे यानेही लाकडी दांड्याने मारहाण करून महिलेला जखमी केले.

कर्जाचे हप्ते फेडण्याचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

दरम्यान येथे उपस्थित असलेला तक्रारदार महिलेचा मित्र विलास काळे हा देखील जखमी झाला आहे. याप्रकरणी जखमी महिलेने (Woman Injured) दिलेल्या फिर्यादीवरून राजेश जंबुकर व वैभव दांदे या दोघांवर शहर पोलिसांनी गंभीर  दुखापत केल्याप्रकरणी विविध कलमानुसार गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे. पुढील तपास पोहेकॉ. धनवट हे करत आहे.

विवाहीतेला पती व इतरांनी मारहाण करुन पळविले

- Advertisment -

ताज्या बातम्या