Friday, April 25, 2025
Homeक्राईमविषारी औषध घेऊन विवाहितेची आत्महत्या

विषारी औषध घेऊन विवाहितेची आत्महत्या

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सासरच्या छळाला (Torture) कंटाळून विवाहितेने विषारी औषधाचे सेवन करून आत्महत्या (Married Woman Suicide) केल्याची घटना सोमवारी (7 ऑक्टोबर) रात्री 12 च्या सुमारास घोसपुरी (ता. नगर) शिवारात घडली. वर्षा गोरख भोसले (वय 28 रा. घोसपुरी, मुळ रा. सारोळा कासार, ता. नगर) असे आत्महत्या (Suicide) केलेल्या विवाहितेचे नाव आहे. दरम्यान, या प्रकरणी तिघांविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोरख चलाश्या भोसले, देवकी शशीकांत भोसले, मागाई चलाश भोसले (सर्व मुळ रा. सारोळा कासार, हल्ली रा. घोसपुरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

- Advertisement -

मयत वर्षाचे आई गायत्री फकफक चव्हाण (वय 40 रा. पडेगाव, ता. कोपरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. वर्षाला घरगुती कारणावरून गोरख भोसले, देवकी भोसले, मागाई भोसले यांनी शारिरीक व मानसिक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून तिने सोमवारी रात्री 12 च्या सुमारास विषारी औषधाचे सेवन केले. तिला उपचारासाठी तिचा पती गोरखने येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले. दरम्यान, तिचा उपचारापूर्वीच मृत्यू (Death) झाला असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले.

सदर घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तालुका पोलिसांनी सुरूवातीला आकस्मात मृत्यूची नोंद केली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर वर्षाच्या आईने नगर तालुका पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली. पोलिसांनी तिघांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गांगर्डे करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...