Friday, January 23, 2026
HomeनगरSuicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Suicide News : सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

पतीसह सासू-सासर्‍यांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

नवीन घर घेण्यासाठी आणि धंदा टाकण्यासाठी माहेरून पैसे आणण्याच्या कारणावरून होणार्‍या छळाला कंटाळून बोल्हेगाव उपनगरात राहणार्‍या विवाहितेने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही हृदयद्रावक घटना सोमवारी (19 जानेवारी) दुपारी घडली आहे. रूकसार नवाज शेख (रा. सरकार चौक, गांधीनगर, बोल्हेगाव) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

- Advertisement -

दरम्यान, याप्रकरणी मयत रूकसारचे वडिल शेख युसुफ हबीब (वय 57, रा. नागापूर) यांनी बुधवारी (21 जानेवारी) तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पतीसह सासू आणि सासर्‍यांविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती नवाज सुलेमान शेख, सासू इन्ताज सुलेमान शेख व सासरे सुलेमान बादशहाभाई शेख (तिघे रा. सरकार चौक, गांधीनगर, बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रूकसानचे विवाह नवाज शेख याच्याशी झाला होता. विवाहनंतर वर्षभर सर्व काही सुरळीत चालले, मात्र त्यानंतर सासरच्या मंडळींकडून तिला पैशांसाठी शारीरिक व मानसिक त्रास देण्यास सुरूवात झाली. जानेवारी 2024 पासून हा छळ अधिकच वाढला होता. नवीन घरासाठी आणि व्यवसायासाठी पैसे हवे आहेत, असा तगादा लावून संशयित आरोपी तिला वारंवार मारहाण करत असत. या त्रासाबाबत मुलीने माहेरी माहिती दिली होती, तेव्हा नातेवाईकांनी मध्यस्थी करून तिची समजूत घातली व तिला पुन्हा सासरी पाठवले होते.

YouTube video player

फिर्यादी हे उपचारासाठी पुणे येथे गेले असताना त्यांना मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. सासरच्या लोकांकडून होणारा सततचा जाच आणि पैशांच्या मागणीला कंटाळूनच तिने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी नवाज शेख, इन्ताज शेख आणि सुलेमान शेख यांच्यावर गुन्हा नोंदवला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

Crime News : भाच्यानेच केला मामाचा खून

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शिंदा (ता. कर्जत) येथील भाळावस्ती परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केला असून मयताचा भाचाच या खुनाचा संशयित आरोपी...