करंजी |वार्ताहर| Karanji
करंजी (Karanji) येथील एका विवाहित महिलेने (Married Woman) रविवार (दि.28) रोजी आत्महत्या (Suicide) केली. या प्रकरणी तिघांवर पाथर्डी पोलिसांत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत काकासाहेब नामदेव जराड, (रा. शेडे, चांदगाव ता. शेवगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तुझ्या वडिलांनी लग्नावेळी हुंडा दिला नाही. त्यामुळे हुंड्याचे एक लाख रुपये घेऊन ये, असे म्हणत मयत वैष्णवी महेश भावले हीस शिवीगाळ करत लाथ्याबुक्कयांनी मारहाण (Beating) करत आत्महत्येस प्रवृत्त केले.
म्हणून मयताचे पती महेश भावले, सासू मंदा भावले व नातेवाईक राजू नाथा वीर (रा. बोधेगाव) या तिघा विरोधात पाथर्डी पोलिसात (Pathardi Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सात महिन्यांपूर्वीच वैष्णवी आणि महेश भावले यांचा विवाह सोहळा पार पडला होता.त्यानंतर काही दिवसातच आर्थिक देवाण-घेवाणीवरून झालेला वाद (Dispute) आणि त्या वादातून या विवाहित युवतीने गळफास घेऊन केलेली आत्महत्या (Suicide) केली. या घटनेमुळे मुलीच्या नातेवाईकांनी रोष व्यक्त करत सोमवारी अंत्यविधीप्रसंगी सासरच्या व्यक्तींना मारहाण (Beating) केली. त्यामुळे काही वेळ याठिकाणी वातावरण तणावपूर्ण बनले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक जगदीश मुलगीर, रणदिवे तांबे यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त पोलिस उपस्थित होता. करंजीचे सरपंच रफिक शेख, माजी सरपंच शिवाजी भाकरे, रावसाहेब भाकरे यांच्यासह गावातील प्रमुख व्यक्तींनी संबंधित नातेवाईकांची समजूत काढत मयत शुभांगी भावले हिच्यावर अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी मयत वैष्णवीचा पती महेश भावले यास पोलिसांनी अटक (Arrested) करण्यात आल आहे.