अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पुण्यात घर घेण्यासाठी माहेरून 15 लाख रूपये आण, अन्यथा परिणाम भोग असा दम देत सतत मानसिक व शारिरीक छळ झाल्याचा आरोप करत एका विवाहितेने तिच्या पतीसह सासरच्या पाच सदस्यांविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सासरच्यांकडून झालेल्या छळामुळे पीडित महिलेचा गर्भपात झाल्याचाही दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
फिर्यादी सावेडीच्या यशोदानगर परिसरात राहतात. त्यांचा विवाह अमोल हनुमंतराव गोपाळघरे (रा. संचारनगर, माउली मंदिराजवळ, सावेडी) याच्याशी झाला होता. सुरूवातीच्या काही महिन्यांत संसार सुरळीत चालला. मात्र त्यानंतर पती अमोल याचे वागणे ेळा ठेवून चोरी करत होता. सासरे हनुमंतराव व सासू अरूणा यांनीही वारंवार मानसिक व शारिरीक त्रास दिला. गरोदर असताना कामे करवून घेतल्याने गर्भपात झाला व त्याचा खर्चही माहेरच्यांना करावा लागल्याचा आरोप तिने केला आहे.
सासरच्यांनी पुण्यात घर घेण्यासाठी व पाईपलाईन रस्ता येथे गाळा विकत घेण्यासाठी तिच्या माहेरून 15 लाख रूपये आणण्याचा तगादा लावला. माहेरची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचे सांगितल्यावर सासरच्यांनी शिवीगाळ व मारहाण केली. सासरे हनुमंतराव यांनी पोलीस खात्यात ओळख असल्याचे सांगून खोट्या केसेस टाकण्याची धमकी दिली. ननंद दिपाली व तिचा पती सुरेश ढाकणे यांनीही सासरच्या मंडळींना भडकवून मानसिक त्रास दिला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणी पती अमोल गोपाळघरे, सासरे हनुमंतराव रामराव गोपाळघरे, सासू अरूणा हनुमंतराव गोपाळघरे, ननंद दिपाली सुरेश ढाकणे, ननंदेचा पती सुरेश रमेश ढाकणे (सर्व रा. संचारनगर, तपोवन रस्ता, माउली मंदिराजवळ, सावेडी) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





