Saturday, April 26, 2025
Homeनगरमाहेरून 5 लाख रुपये मागणीसाठी विवाहितेचा छळ

माहेरून 5 लाख रुपये मागणीसाठी विवाहितेचा छळ

तिघांवर गुन्हा दाखल

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावेत, या मागणीसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करुन तिला घरातून बाहेर हाकलून देण्यात आले. या घटनेबाबत राहुरी पोलीस ठाण्यात तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयश्री नवनाथ धनवटे (वय 37) रा. जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी हल्ली रा. अकोळनेर, ता. जि. अहमदनगर. यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, जयश्री धनवडे यांचे लग्न दि. 28 नोव्हेंबर 2004 रोजी नवनाथ बुधाजी धनवटे, रा. जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी. यांच्याशी झाले होते. लग्न झाल्यानंतर सासरच्या लोकांनी जयश्री धनवडे यांना सहा ते सात महिने चांगले नांदवले.

- Advertisement -

त्यानंतर टॅम्पो घेण्यासाठी जयश्री धनवडे यांनी माहेरहून पैसे आणावेत म्हणून छळ करु लागले. तेव्हा जयश्री धनवडे यांनी त्यांच्या आईकडून 1 लाख 80 हजार रुपये दिले होते. त्यानंतर दोन तीन महीन्याने पैशासाठी पुन्हा जयश्री धनवडे यांचा छळ सुरु केला. सन 2018 मध्ये जयश्री धनवडे यांनी विविध फायनान्स कंपनीचे दोन लाख रुपये कर्ज काढून पती व सासूला दिले. त्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी हप्ते भरण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत, म्हणून जयश्री धनवडे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर दि. 22 मे 2024 रोजी पती- नवनाथ धनवटे हा म्हणाला की, तू तुझ्या आईच्या पेंशनवर परत 5 लाख रुपये कर्ज काढ.

तेव्हा जयश्री धनवडे यांनी नकार दिल्याने त्यांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आणि तू तुझ्या आईकडुन 5 लाख रुपये घेवुन आल्यावर आमच्या घरी नांदावयास यायचे. नाहीतर नांदावयास यायचे नाही. असे म्हणून त्यांनी जयश्री धनवडे यांना घराच्या बाहेर हाकलून दिले. या फिर्यादीवरून पती नवनाथ बुधाजी धनवटे, दिर अनिल धनवटे, सासू लक्ष्मीबाई धनवटे, रा. जोगेश्वरी आखाडा, राहुरी, या तिघांवर गु.र.न 633/2024 भादंवि कलम 323, 34, 498 (अ), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

पहलगाम

मोठी बातमी! पहलगाम हल्ल्याप्रकरणी TRF संघटनेचा घुमजाव; आधी हल्ल्याची जबाबदारी स्विकारली...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे मंगळवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले. तर जे स्थानिक मदतीसाठी धावले, त्यांनाही...