Friday, July 5, 2024
Homeक्राईमबांधकाम व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ

बांधकाम व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत म्हणून विवाहितेचा छळ

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

- Advertisement -

बांधकाम व्यवसायातील मिक्सर घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत तसेच अनेक मागण्यांसाठी विवाहित तरुणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी सासरच्या सहा जणांवर राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक्षा कुणाल सोनवणे, (वय 24) रा. सोनवणे वस्ती, टाकळीमिया ता. राहुरी (हल्ली रा. डिग्रस ता. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले, प्रतिक्षा सोनवणे हिचे लग्न 19 जून 2021 रोजी कुणाल सुरेश सोनवणे याचेशी झाले होते.

सासरच्या लोकांनी प्रतिक्षा हिला लग्न झाल्यानंतर सहा महिने व्यवस्थित नांदवले. त्यानंतर सिमेंट, खडी व वाळूचे काम करण्याकरिता मिक्सर घ्यावयाचा आहे. मिक्सर घेण्यासाठी प्रतिक्षा हिने माहेरहून 8 लाख रुपये आणावेत यासाठी सासरचे लोक प्रतिक्षा हिला वेळोवेळी विनाकारण शिवीगाळ , दमदाटी व मानसिक त्रास देऊन मारहाण करू लागले. त्यानंतर घरातील वेगवेगळ्या कारणावरुन सासरचे लोक प्रतिक्षा हिचा शारीरिक व मानसिक छळ करू लागले. हा प्रकार नेहमीचाच झाला होता. त्याला कंटाळून प्रतिक्षा कुणाल सोनवणे हिने राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

या फिर्यादीवरून आरोपी कुणाल सुरेश सोनवणे, सुरेश जगन्नाथ सोनवणे, नंदा सुरेश सोनवणे, सर्व रा. टाकळीमिया, ता. राहुरी. तसेच ऐश्वर्या सुरज घाडगे, सुरज अशोक घाडगे, अशोक रामचंद्र घाडगे, रा. मल्हारवाडी, ता. राहुरी या सहा जणांवर गु.र.नं. 687/2024 भादंवि कलम 323, 34, 498 (अ), 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

- Advertisment -

ताज्या बातम्या