Monday, April 28, 2025
Homeनगरविवाहित तरुणीचा सासरी छळ; चौघांवर गुन्हा

विवाहित तरुणीचा सासरी छळ; चौघांवर गुन्हा

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

26 वर्षीय विवाहित तरुणीला लग्नात हुंडा दिला नाही, तुला मुलबाळ होत नाही, मला दुसरे लग्न करायचे असून तू संमती दे असे म्हणून शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घराबाहेर काढून दिल्याचा प्रकार कनकुरी (शिर्डी, ता. राहाता) येथे घडला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी सासरच्या चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

याबाबत शहर पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, घुलेवाडी (ता. संगमनेर) येथील सव्वीसवर्षीय तरुणीचा कनकुरी येथील यशोदीप बाबासाहेब शेटे याच्याशी सन 2022 मध्ये विवाह झालेला आहे. विवाहानंतर साधारण दीड महिन्यानंतर सासरी नांदत असताना सासरे बाबासाहेब बबनराव शेटे, सासू वृषाली बाबासाहेब शेटे व दीर श्रेयस बाबासाहेब शेटे हे तुझ्या वडिलांनी लग्नात दोन लाख रुपये हुंडा दिला नाही आणि आमचा मानपान व्यवस्थित केला नाही. तुला घरातील कामेही करता येत नाही म्हणून सतत शिवीगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत होते.

तसेच पती यशोदीप याने तुला मुलबाळ होत नाही, मला दुसरे लग्न करायचे असून तू मला स्टॅम्प पेपरवर संमती दे असे म्हणून पीडित तरुणीला शिवीगाळ आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन घरातून काढून दिले. अखेर वैतागून संगमनेर शहर पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी पीडित विवाहित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून सासरच्या वरील चौघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सुजाता थोरात करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नांदुरमध्यमेश्वरला बिबट्याची दहशत

0
नांदुरमध्यमेश्वर | वार्ताहर Nandurmadhyameshwar नांदुरमध्यमेश्वर येथे बिबट्याने दहशतीचे वातावरण केले आहे. दि.26.4.2025 रोजी रात्री 10 ते12 वाजेच्या सुमारास त्रिंबक पुंजाजी दाते यांचे कडील कुत्र्यावर हल्ला...