Monday, September 30, 2024
Homeनाशिकमाऊली मित्र मंडळाचे उपक्रम स्तूत्य : पाटील

माऊली मित्र मंडळाचे उपक्रम स्तूत्य : पाटील

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

- Advertisement -

माऊली मित्र मंडळ हे गरजूंच्या मदतीला धावून जात असल्याने या मंडळाचे सामाजिक उपक्रम स्तूत्य आहे असे प्रतिपादन मनपाचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केले.

नवीन नाशिक मधील माऊली लॉन्स येथे माऊली मित्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रम प्रसंगी पाटील बोलत होते . यावेळी व्यासपिठावर मंगळाचे अध्यक्ष अमोल शेळके ,खजिनदार विकास शिंदे ,उपाध्यक्ष राहुल सांगळे ,कार्याध्यक्ष उमेश सावळे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष अमोल शेळके यांनी केले प्रास्तविकात शेळके यांनी मंडळाच्या वतीने आयोजित उपक्रमांची माहिती दिली यावेळी माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या हस्ते मंडळाच्या पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालनसुमित बोराळे तर आभार खजिनदार विकास शिंदे यांनी मानले .

- Advertisment -

ताज्या बातम्या