Sunday, May 5, 2024
Homeनगरविद्युत दाहिनीसाठी महापौरांनी केली पालमंत्र्यांकडे निधीची मागणी

विद्युत दाहिनीसाठी महापौरांनी केली पालमंत्र्यांकडे निधीची मागणी

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोना मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे. नालेगाव स्मशानभूमीतील विद्युत दाहिनीवर ताण येत आहे.

- Advertisement -

त्यामुळे महापालिकेच्या केडगाव व स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत विद्युत दाहिनी उभारण्यासाठी निधी द्यावा, अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. महापौर वाकळे यांनी यासंदर्भात निवेदन दिले आहे. नालेगाव स्मशानभूमीत करोना मृतांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत.

मात्र, तेथील विद्युत दाहिनीची क्षमता अपुरी पडत आहे. मनपाच्या केडगाव व स्टेशन रोडवरील स्मशानभूमीत जागा उपलब्ध असून, याठिकाणी विद्युत दाहिनी बसविणे आवश्यक आहे. शासनाने जिल्हास्तर नगरोत्थान योजनेतून निधी देण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे या योजनेतून मनपाला विद्युत दाहिनीसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी वाकळे यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या