Monday, May 27, 2024
Homeराजकीयमहापौरांसह नवग्रह ग्रुपने मुंबईत घेतली शिवसेना नेत्यांची भेट

महापौरांसह नवग्रह ग्रुपने मुंबईत घेतली शिवसेना नेत्यांची भेट

जळगाव – Jalgaon – प्रतिनिधी :

महापौर, उपमहापौरांपाठोपाठ भाजपातील बंडखोर अर्थात नवग्रह गु्रपमधील नगरसेवकही मुंबईत गेले आहेत. दरम्यान, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ना. सुभाष देसाई, खा. संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, विलास पारकर, संजय सावंत यांची मंगळवारी भेट घेतली.

- Advertisement -

शहराच्या सर्वांगिण विकासासाठी निधीबाबत चर्चा करण्यासाठी महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, सुनिल महाजन, ललित कोल्हे यांच्यासह नवग्रह गु्रपमधील नगरसेवक किशोर बाविस्कर, नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, चेतन सनकत, गजानन मालपुरे, भरत कोळी, सुधीर पाटील, गजानन देशमुख, कुंदन काळे, उमेश सोनवणे हे देखील मुंबईला गेले आहेत.

यावेळी महापौरांसह नगरसेवकांनी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, ना. सुभाष देसाई,खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, विलास पारकर, संजय सावंत यांची मंगळवारी भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या