मुंबई | Mumbai
राज्यातील २९ महापालिकांसाठी मंत्रालयात राज्यमंत्री माधुरी मिसाळ (Minister Madhuri Misal) यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत जाहीर झाली. त्यात एससी प्रवर्गासाठी तीन, एसटीसाठी एक,सर्वसाधारण प्रवर्गासाठी १७ आणि नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आठ जागा असणार आहेत. यामध्ये एससी प्रवर्गातील तीन पैकी दोन महिलांसाठी राखीव असणार आहे. १७ पैकी नऊ ठिकाणी महिला महपौर असणार आहे.
हे देखील वाचा : Mayor Reservation : महापौर पदाची लॉटरी कुणाला? २९ महानगरपालिकांसाठी आज आरक्षण सोडत
यात कल्याण डोंबिवली महापालिकेत एसटी प्रवर्गासाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे. तर ठाणे, जालना (महिला) आणि लातूर (महिला) महापालिकेत अनुसूचित जाती (एससी) प्रवर्गासाठी महापौरपद आरक्षित झाले आहे. तसेच पनवेल, इचलकरंजी, अहिल्यानगर (महिला) चंद्रपूर (महिला) जळगाव (महिला) कोल्हापूर, अकोला (महिला) आणि उल्हासनगरमध्ये ओबीसी प्रवर्गाचा महापौरपद असणार आहे.
तर मुंबई (महिला) नवी मुंबई (महिला) नाशिक (महिला) धुळे (महिला), मालेगाव (महिला) परभणी, छत्रपती संभाजीनगर, वसई विरार, भिवंडी-निजामपूर, मीरा-भाईदर (महिला) नांदेड (महिला) पुणे (महिला), पिंपरी चिंचवड, सांगली-मिरज कुपवड, नागपूर (महिला) अमरावती आणि सोलापूर महापालिकेत खुल्या प्रवर्गाचा महापौर होणार आहे.




