Friday, January 23, 2026
HomeनगरAhilyanagar : नगराध्यक्षपदासाठी आणखी 16 तर नगरसेवक पदासाठी 199 अर्ज

Ahilyanagar : नगराध्यक्षपदासाठी आणखी 16 तर नगरसेवक पदासाठी 199 अर्ज

आता उरले अवघे दोन दिवस || आतापर्यंत 306 अर्ज दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर होणार्‍या जिल्ह्यातील पालिका निवडणुकीसाठी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मुदत दिल्याने 12 पालिकांच्या नगराध्यक्षपदासाठी आणखी 16 तर नगरसेवक पदासाठी 199 इच्छुकांचे उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. आता उमेदवारी दाखल करण्यासाठी आज रविवार आणि उद्या सोमवार (दि.17) शेवटचे दोन दिवस असल्याने उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

- Advertisement -

दरम्यान, यापूर्वी शनिवार आणि रविवारी राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारी दाखल करण्यास परवानगी दिलेली नव्हती. मात्र, उमेदवारी दाखल करण्यास दिसून आलेला निरुत्साह पाहाता निवडणूक आयोगाने ऐनवेळी शनिवार व रविवारी सुट्टीच्या दिवशी ऑनलाईन व पूर्वीच्या पारंपारिक पध्दतीने उमेदवारी दाखल करण्याची परवानगी दिली. यामुळे काल सुट्टीच्या दिवशी श्रीरामपूर, कोपरगाव, पाथर्डी आणि शेवगाव पालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची झुंबड उडालेली दिसून आली.

YouTube video player

जिल्ह्यात सर्वाधिक 55 उमेदवारी अर्ज एकट्या शेवगाव पालिकेत दाखल झाल्याचे दिसून आले. पाथर्डी पालिकेत देखील हे प्रमाण 37 होते. यामुळे यंदा आतापर्यंतच्या पालिका निवडणुकीच्या टप्प्यात शेवगाव-पाथर्डीत अधिक उत्साह असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आता पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी अखरेचे दोनच दिवस शिल्लक आहेत. यामुळे दोन दिवसात मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

शिर्डी, देवळालीचे गणित अनुत्तीर्ण
जिल्ह्यातील 12 पालिकांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, आतापर्यंत शिर्डी पालिकेच्या निवडणुकीत ना सत्ताधारी ना विरोधी यापैकी कोणाचे अर्ज दाखल झालेले नाहीत. यामुळे शिर्डी नगराध्यक्षपदासाठी एकही अर्ज आलेला नाही. या ठिकाणी नगरसेवक पदासाठी 10 अर्ज आलेले आहेत. यासह देवळाली प्रवरा पालिकेसाठी नगराध्यक्षपदासह नगरसेवक पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. यामुळे या ठिकाणचे राजकीय गणित मुठीत लपलेले दिसत आहे.

शनिवारी दाखल अर्ज
संगमनेर नगराध्यक्ष पद 1, नगरसेवक पद 6. श्रीरामपूर नगराध्यक्ष पद 2, नगरसेवक पद 34. कोपरगाव नगराध्यक्ष पद 1, नगरसेवक पद 30. शिर्डी नगराध्यक्ष पद 0, नगरसेवक नगराध्यक्ष पद 5. राहाता पद 1, नगरसेवक पद 5. देवळाली शून्य, राहुरी नगराध्यक्ष पद 1, नगरसेवक नगराध्यक्ष पद 9. पाथर्डी नगराध्यक्ष पद 3, नगरसेवक नगराध्यक्ष पद 34. श्रीगोंदा नगराध्यक्ष पद 2, नगरसेवक पद 14. जामखेड नगराध्यक्षपद शून्य, नगरसेवक पद 6. शेवगाव नगराध्यक्ष पद 2, नगरसेवक पद 53 आणि नेवासा नगराध्यक्ष पद 3 आणि नगरसेवक पद 6 असे 16 इच्छुकांचे नगराध्यक्षपदासाठी 16 तर 199 नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल झाले आहेत. यामुळे नगराध्यक्षपदासाठी 31 तर नगरसेवक पदासाठी 275 असे 306 उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत.

ताज्या बातम्या

एकनाथ

KDMC मध्ये मनसेच्या पाठिंब्याबाबत एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, मनसेने विकासाच्या...

0
मुंबई | Mumbaiशिवसेनापक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (शुक्रवार, 23 जानेवारी) 100 वी जयंती आहे. या निमित्ताने राज्यभरात शिवसैनिकांनी विविध कार्यक्रमांचे आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन...