Wednesday, June 10, 2026
Homeमहाराष्ट्रMeenatai Thackeray : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरेंची सेना आक्रमक

Meenatai Thackeray : मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरेंची सेना आक्रमक

मुंबई । Mumbai

दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी, स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग टाकण्याचा प्रयत्न झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली असून, अज्ञात व्यक्तीने हा प्रकार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत पुतळ्याची साफसफाई केली.

- Advertisement -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना पहाटे सहा ते साडेसहाच्या दरम्यान घडली असावी. पुतळ्यावर लाल रंग टाकलेला दिसल्यानंतर स्थानिक नागरिक आणि शिवसैनिकांना याची माहिती मिळाली. सकाळी आठच्या सुमारास काही शिवसैनिक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी थिनरचा वापर करून पुतळ्याच्या आजूबाजूला पसरलेला लाल रंग पुसून काढला. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक आमदार आणि खासदार यांनीही घटनास्थळी भेट दिली.

या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असून, त्यात एक व्यक्ती पुतळ्याच्या जवळ आल्याचे दिसून आले आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ठाकरे गटाकडून अद्याप यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली नाही, मात्र जर तक्रार दाखल झाली नाही, तर पोलीस स्वतःहून या घटनेची नोंद घेऊन तपास करतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. पुतळ्याची विटंबना करण्याचा हा प्रकार कोणी आणि कोणत्या उद्देशाने केला, याचा शोध पोलीस घेत आहेत.

मीनाताई ठाकरे यांना शिवसैनिक प्रेमाने ‘मासाहेब’ म्हणून संबोधतात आणि त्यांचे शिवसैनिकांसाठी मोठे स्थान आहे. १९९५ साली त्यांचे निधन झाल्यानंतर शिवाजी पार्क येथे त्यांचा अर्धपुतळा उभारण्यात आला होता. तेव्हापासून हा पुतळा या ठिकाणी आहे. या घटनेमुळे शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी या घटनेमागे काही समाजकंटकांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. ही घटना म्हणजे मासाहेब ठाकरे यांच्याविषयी आदर नसलेल्या व्यक्तींनी केलेला दुर्दैवी प्रकार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.या घटनेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण तापले असून, पुढील काळात पोलीस तपासातून नेमके काय समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

ताज्या बातम्या

Trimbakeshwar Darshan Scam : डिजिटल पुराव्यांच्या चक्रव्यूह; ३०० पानांच्या दोषारोपपत्रातून गैरव्यवहाराचे...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात व्हीआयपी दर्शनाच्या नावाखाली भाविकांची आर्थिक लूट करणाऱ्या रॅकेटप्रकरणी पोलिसांनी (Police) न्यायालयात (Court) तब्बल ३०० पानांचे दोषारोपपत्र (चार्जशीट)...