Thursday, September 19, 2024
Homeब्रेकिंग न्यूजउत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली...

उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा तीन मजली इमारत कोसळली; नऊ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) पुन्हा एकदा इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौमधील (Lucknow) ट्रान्सपोर्ट नगरमधील हरमिलाप टॉवरचा एक भाग कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यांनतर पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये तीन मजली इमारत कोसळली आहे.

या दुर्घटनेत आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू (Death) झाला असून यामध्ये दीड वर्षांच्या चिमुकलीचा समावेश आहे. तसेच या इमारतीच्या ढिगाऱ्याखालून १४ जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. तर अजूनही काही जणं ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच मुख्यमंत्री कार्यालयाने (CMO Office) या घटनेची दखल घेतली असून अधिकाऱ्यांना तत्काळ मदतीचे निर्देश देण्यात आले आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी रात्री मेरठच्या झाकीर कॉलनी इथं ही दुर्घटना घडली असून संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ३५ वर्षे जुनी तीन मजली इमारत मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) कोसळली. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५ जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. यापैकी १४ जणांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच ५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. एक जण अजूनही ढिगाऱ्याखाली अडकला आहे. त्याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे मृतांचा संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर उत्तर प्रदेशात मुळधार पावसामुळे आलेल्या पुरात वाहून १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना सरकारकडून ४ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी केली आहे. त्याचबरोबर पशूधनाचंही मोठं नुकसान झाले आहे. त्या कुटुंबांनादेखील मदतनिधी देण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या