Friday, November 22, 2024
Homeनाशिकआदिवासी सोसायट्यांच्या प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

आदिवासी सोसायट्यांच्या प्रश्नांबाबत मुंबईत बैठक

दिंडोरी | प्रतिनिधी | Dindori

राज्यातील आदिवासी विकास कार्यकारी सहकारी संस्थांच्या (Tribal Societies) विविध मागण्यांबाबत आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांचे उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी मुख्यतः आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ न मिळण्याची सर्वसाधारण कारणे जाणून घेतली.

- Advertisement -

हे देखील वाचा : नाशिक कृउबा समितीचे तत्कालीन बडतर्फ सचिव अरूण काळे यांना अटक

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. केंद्र शासनाच्या सन २००८ च्या कर्जमाफी योजनेचा रु. ३०४.६१ कोटी रकमेचा लाभ शेतकऱ्यांना (Farmer) मिळालेला नाही. आजही आदिवासी जनतेची अर्थव्यवस्था ही कृषी व संलग्न व्यवसायावर प्रामुख्यानं अवलंबून असल्याचे नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांनी सांगितले.

हे देखील वाचा : आता वर्षाला ३ घरगुती गॅस सिलेंडर मोफत; ‘या’ महिलांना मिळणार लाभ

दरम्यान, त्या अनुषंगानं सदर आदिवासी शेतकऱ्यांना (Tribal Farmer) कर्जमाफी योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता योग्य पावलं उचलण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला संबधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या