Thursday, January 8, 2026
Homeमहाराष्ट्रमहायुतीची दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

महायुतीची दादा भुसेंच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

नाशिक शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी आज महायुतीच्या घटक पक्षांची बैठक मंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत झाली.

या बैठकीत भुसे म्हणाले की, महायुतींचा विजय निश्चित आहे. मात्र गाफील न राहता प्रत्येक मतदार शिक्षकांपर्यंत पोहचून मतदानाचा टक्का कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे. प्रत्येक पदाधिकार्‍यांनी आपल्या विभागातील मतदार नातेवाईक, मित्र यांच्यासमवेत चर्चा करून मतदान करून घ्यावे. किशोर दराडे यांनी केलेले काम मतदारांपर्यंत पोहचविले तर मतदार नक्कीच आपलं पवित्र दान आपल्याला देतील असा विश्वास देखील मंत्री भुसे यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

दरम्यान,यावेळी आमदार देवयानी फरांदे, आ. सरोज अहिरे, आ. माणिकराव कोकाटे, आ. सीमा हिरे, आ. राहुल ढिकले, माजी खासदार हेमंत गोडसे यांच्यासह आदी मान्यवर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

YouTube video player

ताज्या बातम्या

नगरसेवक

Ambernath: अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा धक्का; ‘ते’ १२ नगरसेवक भाजपच्या गोटात

0
मुंबई | Mumbaiअंबरनाथमध्ये भाजप आणि काँग्रेसने केलेली युती राज्यात चर्चेत ठरली आहे. येथील सत्ताधारी भाजपला काँग्रेस नगरसेवकांनी विकासाच्या मुद्द्यावरुन पाठिंबा दिला होता. त्यावरुन, सुरू...