Saturday, July 27, 2024
Homeनाशिकपर्यटन क्षेत्र विकासाबाबत बैठक

पर्यटन क्षेत्र विकासाबाबत बैठक

ओझे । वार्ताहर Oze

दिंडोरी तालुक्यातील ( Dindori Taluka )ओझरखेडसह ( Ozharkhed ) विविध पर्यटन (tourism sector )परिसराचा विकास व्हावा, यासाठी विधानभवन येथे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ ( Assembly Vice President Narhari Jhirwal )यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन येथे बैठक पार पडली.

- Advertisement -

यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी सांगितले की, नाशिक जिल्हा हा पर्यटन दृष्टय अत्यंत महत्वाचा जिल्हा आहे. जिल्ह्यामध्ये पर्यटन विभागामार्फत काही क्षेत्राचा विकास करण्यात आला आहे. परंतु, जिल्हयातील काही ऐतिहासिक व निसर्गरम्य क्षेत्राचा विकास करणे आवश्यक आहे.

रणतळे, रामशेज किल्ला, सप्तशृंगी गड येथील चंडीकापूर ते पोट्या गणपती साती पायर्‍या, देवसाने मांजरपाडा वळण योजणा निसर्ग पर्यटन केंद्र आणि आदिवासी आयुर्वेद केंद्र, शेवखंडी, ता.पेठ, निसर्ग पर्यटन केंद्र या परिसराचा विकास करणे गरजेचे आहे. क्षेत्राचा विकास आराखडा (डी.पी.आर) तयार करून घेण्यात यावा. तसेच त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून देऊन सदर क्षेत्राचा विकास करण्यात यावा अशी मागणी केली.

पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत सर्वतोपरी सहकार्य करत विकासनिधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. अधिकार्‍यांकडून पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी पर्यटन संचालक धनंजय सावळकर, उपसचिव वनमंत्रालय गजेंद्र नरवणे, उपसंचालक पर्यटन सारंग कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अलका अहिरराव आदींसह जलसंपदा, वन,पर्यटन विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या