Wednesday, January 7, 2026
Homeक्राईमCrime News : व्यापार्‍यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी जेरबंद

Crime News : व्यापार्‍यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी जेरबंद

कर्जत |प्रतिनिधी| Karjat

रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून कर्जत येथील आडते व्यापारी रामराजे प्रफुल्ल नेवसे यांच्यावर हल्ला करणारा मुख्य आरोपी सुभाष मंजुळे यास पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली. 18 जानेवारी 2025 ला सकाळी नऊ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वाराजवळ शेतकर्‍यांना शेतीमालाचे पैसे देण्यासाठी सुमारे दीड लाख रुपये बॅगमध्ये घेऊन येत असणारे व्यापारी रामराजे प्रफुल्ल नेवसे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी अंगावर मिरची पावडर फेकून, रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून त्यांच्याकडील दीड लाख रुपये रोख रकमेची बॅग बळजबरीने लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र तो प्रयत्न नेवसे यांच्या सतर्कतेमुळे फसला व आरोपी मोटारसायकलवर पळून गेले.

- Advertisement -

या आरोपींच्या विरोधात कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलांनी यांनी व्यापारी रामराजे नेवसे यांना लुटणार्‍या दोन आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीमध्ये नेवसे यांच्या आडतीवर हमाल म्हणून कामास असलेला अमोल सुभाष मंजुळे (वय 24, रा. वडगाव तनपुरा, ता. कर्जत) याने साथीदारांना माहिती देऊन गुन्हा करण्यासाठी आवश्यक ती मदत केली असल्याची माहिती मिळाली. या घटनेमध्ये एकूण आठ आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी पाच आरोपींना पोलिसांनी स्थानिक गुन्हान्वेषण विभागाच्या मदतीने अटक केली होती. मात्र यातील मुख्य आरोपी मंजुळे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता आणि वारंवार पोलिसांना चकवा देत होता.

YouTube video player

तो कर्जत तालुक्यातील गुंडाची वाडी येथे शेत शिवारात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. मंजुळे याच्यावर कर्जत पोलीस स्टेशनसह, पाथर्डी, शिरूर कासार, अमळनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली.

ताज्या बातम्या

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा- राज्य निवडणूक आयुक्तांचे...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai महानगरपालिका निवडणुकांसाठीचे मतदान आणि मतमोजणीकरिता पुरेशा प्रमाणात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या सर्वांचे वेळेत प्रशिक्षणही पूर्ण झाले पाहिजे; तसेच...