Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यायंदा पाऊस कसा राहणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

यंदा पाऊस कसा राहणार? हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती

मुंबई | Mumbai

देशभरात २०१९ ते २०२१ या मागील चार वर्षांत आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपूरा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यांत पावसाने (Rain) धुमाकूळ घातला होता. त्यामुळे बऱ्याच राज्यांची परिस्थिती बिकट झाली होती. तर मागील वर्षी हवामान विभागाने (Meteorological Department) ९६ टक्के पावसाचा इशारा दिला होता. त्यानंतर आता यावर्षी सुद्धा हवामान विभागाकडून पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे…

- Advertisement -

“तुमचं खरं काडतूस…”; संजय राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल

जागतिक हवामान विभागाने (World Meteorological Department) भारतात जून आणि जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविली आहे. तसेच ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा ५० टक्के कमी पाऊस होणार असल्याचे म्हटले आहे. तर नैऋत्य मान्सूनचा प्रभाव जुलैपर्यंत अधिक असल्याने बंगालची खाडी व अरबी समुद्रातील मोसमी वाऱ्यांचा ( Winds) फायदा मिळतो. त्यामुळे ९० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता यंदा वर्तविण्यात आली आहे.

मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, अदानी कितव्या स्थानावर?

तसेच मागील दोन वर्षांपासून अल निनो वादळ (El Nino storm) सक्रीय असल्याने याचा परिणाम पावसावर होण्याची शक्यता आहे.तसेच यंदा प्रशांत महासागरात अल-निनो सक्रिय झाल्याच्या सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे भारतातील मान्सूनच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

काळजी घ्या, करोना वाढतोय! सक्रिय रुग्णसंख्या २३००० पार; नव्या रुग्णांमध्ये वाढ

तर दुसरीकडे राज्यात उन्हाचा (Summer) कडाका जाणवत असला तरी पावसास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी गुरूवार (दि.६) ते शनिवार (दि.८) एप्रिल दरम्यान मेघगर्जना आणि विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या