Saturday, May 25, 2024
Homeनगरतिघा मित्रांना एमआयडीसीत मारहाण

तिघा मित्रांना एमआयडीसीत मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

धार्मिक कार्यक्रम आटोपून घरी जाणार्‍या तीन मित्रांना सात ते आठ जणांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि. 2) रात्री 10 वाजता एमआयडीसीतील गरवारे चौकात घडली. याप्रकरणी ईस्माईल नसिर पठाण (वय 24 रा. देहरे ता. नगर) यांनी रविवारी (दि. 3) दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सात ते आठ अनोळखी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

पठाण हे त्यांच्या मित्रांसोबत घरी जात असताना गरवारे चौकात त्यांना सात ते आठ जणांनी अडविले. शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरडाओरडा केला. कत्तीने जिवे मारून टाकण्याची धमकी दिली. दरम्यान, पठाण यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती देत मारहाण करणार्‍या संशयित अनोळखी सात ते आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. घटनेची माहिती मिळताच सहा. पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक दीपक पाठक अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या