Saturday, May 4, 2024
Homeजळगावहॉटेलमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा डल्ला!

हॉटेलमध्ये मध्यरात्री चोरट्यांचा डल्ला!

जळगाव jalgaon। प्रतिनिधी

मध्यरात्रीच्या (midnight) सुमारास अंधाराचा फायदा घेत हॉटेलचे (hotel) शटर वाकवून (Bending the shutters) ममुराबाद रोडवरील प्रजापत नगरातील हॉटेलमध्ये चोरट्यांनी (thieves) डल्ला मारल्याची घटना सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. चोरट्यांनी गल्ल्यातील 17 हजारंची रोकडसह 2 हजाराचा सीपीयू चोरुन नेला. ही संपुर्ण घटना हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शहरातील शनिपेठेत चेतन अनिल वाणी हे वास्तव्यास असून त्यांची ममुराबाद रोडवरील प्रजापत नगर येथे मितवा नावाने हॉटेल आहे. रविवारी रात्री दहा वाजता चेतन वाणी यांनी नेहमीप्रमाणे हॉटेल बंद करुन घरी गेले. त्यानंतर त्यांनी कुटुंबियांसोबत जेवण करुन ते झोपून गेले. सोमवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ते नेहमीप्रमाणे हॉटेल उघडण्यासाठी आले असता, त्यांना हॉटेलच्या शटरचे एका बाजूने थोडे उचकवलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यांनी शटरचे कुलूप उघडून आत प्रवेश केल्यानंतर त्यांना काऊंटरमधील चिल्लर व चाव्या ह्या काऊंटरवर दिसल्या. त्यांनी लागलीच गल्ल्याची तपासणी केली. यावेळी त्यांना गल्ल्यात ठेवलेली 17 हजारांची रोकड व हॉटेलमधील सीपीयू दिसून आला नाही.

घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

चोरटा मध्यरात्रीच्या सुमारास हातात बॅटरी घेवून हॉटेलमध्ये शिरत आहे. त्यानंतर त्याने हॉटेलच्या गल्ल्यातील रोकड लांबवून तो सुमारे पंधरा ते वीस मिनिट हॉटेलच्या आवारात फिरत होता. त्यानंतर चोरटा दुचाकीने ममुराबाद गावाच्या दिशेने गेल्याची संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. पोलिसांनी याठिकाणाहून संपुर्ण फुटेज ताब्यात घेतले असून त्यानुसार संशयिताचा शोध सुरु आहे.

पथकाने घेतले चोरट्यांच्या हाताचे ठसे

हॉटेलमध्ये चोरी झाल्याची लक्षता येताच चेतन वाणी यांनी घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तसेच श्वान पथकाासह ठसे तज्ज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. त्यांनी याठिकाणाहून चोरट्यांच्या हाताचे ठसे घेतले असून त्यानुसार ते संशयित आरोपीचा शोध घेत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या